सातारा:- खंडाळा येथील रिएटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संपावर असलेल्या कंपनी मधील कामगारांना सातारा जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचा पाठिंबा.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8209717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सातारा:-खंडाळा येथील रियटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मधील रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनच्या कामगारांचा गेली 7 दिवस झाले बेमुदत संप चालू असताना आज सातारा जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख (शिंदे गट) पुरषोत्तम जाधव तसेच आदेशदादा जमदाडे खंडाळा तालुका प्रमुख शिवसेना (ठाकरे गट) यांनी तेथे जाऊन संपाला बसलेल्या 348 लोकांवर होणाऱ्या अन्यायाची विचारपूस केली. त्या नंतर रियटर इंडिया एम्प्लॉइज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी योगेश खामकर यांनी संप का करावा लागला त्याची कारणे सांगितली व मागण्या सांगितल्या त्यावर त्यांनी लवकरच आपण मंत्रालयात हा विषय मांडून ह्यावर लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वासन देखील दिले. कामगार चळवळी बद्दल बोलत असताना ते बोलले की काही स्थानिक पुढारी स्वतःची कॉन्ट्रॅक्ट वाचवण्यासाठी तसेच काहीजण स्वतःच्या खिशाची खडगी भरण्यासाठी असले घाणेरडे राजकारण करत आहेत. त्यांनी ही असली घाणेरडी कामे बंद करावीत असा इशारा त्यांनी ह्या वेळी दिला. रियटर मधील कामगारांनी संप केल्या नंतर सातारा जिल्ह्यामध्ये 144 कलम प्रत्येक वेळेस लावले जाते त्या कामगारांना न्याय मिळू नये? त्यांच्याकडे कोणाचे लक्ष जाऊ नये? ह्या हेतून त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय. ह्याच्या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ असे ते म्हणाले.सर्व कामगारांसमोर तेथूनच त्यांनी साताराचे कामगार आयुक्त श्री. भिसले यांना कॉल लावून विचारणा करून लवकरात लवकर हे सगळे मार्गी लावा असे आदेश दिले. नाहीतर हा विषय मंत्रालयात घेऊ, तेथे उत्तरे द्या असे सांगण्यात आले. आदेशदादा जमदाडे यांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास ते देण्याची ग्यावही दिली तसेच कामगारांना भक्कम पाठिंबा दर्शवला.