कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचे आयोजन.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचे आयोजन.
आज आमच्या आश्रमशाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या भाषण आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी दोन्ही स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम होत्या. त्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी केलेली भाषणे अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण होती. काही विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमधून भाषणे केली. स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले.
शिक्षक मनोगत उपशिक्षक श्री महेशकुमार बोभाटे सर यांनी केले. त्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.
उपशिक्षक श्री रमेश घोलप सर यांनी समीक्षक मनोगत मधून वकृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांसाठी गुणदान योजना व प्रभावी वक्तृत्वासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ भारती मोहिते मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती सांगितली. त्यांच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमधून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचा परिचय करून दिला.
यावेळी सर्व शिक्षक, अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमशाळेतील विद्यार्थिनी कु.हर्षदा दंडीले हिने केले. प्रास्ताविक कु. प्रतीक्षा शेंडगे हीने केले व आभार कु. पूजा मोरे हिने मानले.