महाबळेश्वर:-हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मोहरम सन महाबळेश्वर येथे मनोभावे साजरा.
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर:-9403546485

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मोहरम सन महाबळेश्वर येथे मनोभावे साजरा
मोहरम हा इस्लामिक कॅलेंडर मधील पहिल्या महिन्याचे नाव या महिन्यात मुस्लिम समाजाच्या नव्या वर्षाची सुरुवात होते मोहरमच्या महिन्यात हजरत मोहम्मद पैंगबर यांचे नातू हसन व हुसेन करबला येथे शहिद झाले होते त्यांच्या स्मृती प्रित्यार्थ मुस्लिम बांधव मोहरमच्या 10 तारखेला शोक व्यक्त करतात.
महाबळेश्वर येथे मोहरमच्या पाच तारखेला दोन ठिकाणी पंज्यांची स्थापना केली जाते. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणार्या या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव मनोभावे प्रार्थना करताना दिसतात अबुलाल शेख व गाडगे मामा यांचे वंशज व त्यांचे इतर सहकारी मनोभावे सेवा करतात दरवर्षी प्रमाणे यंदाही मुख्य बाजारपेठ मार्गे शांततामय मार्गाने मिरवणूक काढण्यात आली होते यामध्ये अनेक लोक सहभागी झाले होते या मिरवणुकीची सांगता पेटीट लायब्ररी येथे झाला.
सदरचा मोहरमचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खदिम आसिफभाई शेख , भरत घाडगे, तौफिक भाई पटवेकर, अय्याज खाटीक, परवेज व एजाज शेख, अर्शद कुरेशी व इतर त्यांच्या सहकार्यानी विशेष परिश्रम घेतले