खटाव:-वडगाव येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न.
पत्रकार नितीन कुलकर्णी:-9307293406

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नितीन कुलकर्णी
आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न.
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वडगांव (जयराम स्वामी) ता.खटाव येथील जयराम स्वामी सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्रदादा पवार यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फित कापून उद्घाटन करण्यात आले.
पुसेसावळी परिसरातील नागरिक आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी झाले होते, सह्याद्री स्पेशालिस्ट हॉस्पिटल कराड येथील तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णांनाची तपासणी करण्यात येत होती.
आमदार बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज बाबा पाटील यांनी शिबिरास भेट दिली त्यावेळी बोलताना म्हणाले आमदार बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस समाज उपयोगी नियोजनाने साजरा करण्यात येत आहे, यामध्ये आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप रक्तदान शिबीर,अशा अनेक नियोजनाने साजरा करण्यात येत आहे. सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे यांच्या सहकार्याने वडगाव येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुसेसावळी व पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावतीने केक कापून, माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार(दादा), खटाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, सुरेश पाटील, सी.एम.पाटील, भाऊसाहेब लादे, सुहास पिसाळ, अनिल माने, विलास शिंदे, साहेबराव शिंदे, आनंदराव यादव, सुहास शिंदे, संभाजी थोरात, साधुनाना मगर, दादा दगडे, दुटाळ सर, दिनकर फाटक, योगिता कुंदप, शुभांगी घार्गे, उषाताई पवार, अविनाश घार्गे, पिंटू घार्गे, पै.बापूसो माने, लहू जाधव तसेच पुसेसावळी परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.