नवी मुंबई:-यशस्वी पाठपुरावा – सानपाडा परिसरातील गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात डास विरोधी धुरीकरण फवारणीला पुन्हा सुरुवात ..
सह - संपादक आशितोष चव्हाण:-7378619519

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह – संपादक आशितोष चव्हाण
नवी मुंबई:-यशस्वी पाठपुरावा
सानपाडा परिसरातील गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात डास विरोधी धुरीकरण फवारणीला पुन्हा सुरुवात ….
दिनांक ४ जुलै 2023 रोजी मा. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या भेटीमध्ये शिवसेना उपनेते श्री.विजयजी नाहटा यांच्या माध्यमातून मी लेखी पत्र व्यवहार केला होता की सानपाडा परिसरात काही महिन्यांपासून प्रशासनाद्वारे डास विरोधी धुरीकरण मोहीम राबवली जाते परंतु ती फक्त बंद गटांरामध्येच केली जाते. गृहनिर्माण सोसायटीच्या अडगळीची जागा जिन्याखालील जागा मागील परिसर अथवा पाणी साचणारी जागा अशा ठिकाणी फवारणी केली जात नाही .या निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांना सदर विषयासंबंधी मी विनंती केली होती की सदर ठिकाणी सुद्धा पावसाळा बघता धुरीकरण फवारणी करणे आवश्यक वाटते. जेणेकरून डास तसेच मच्छरांचा प्रादुर्भाव वाढणार नाही. त्यास अखेर यश मिळाले आजपासून पालिकेने पुन्हा एकदा से.७,८ व से.१० या परिसरातील सोसायटीच्या अडगळीच्या जागा जिन्याखालील जागा सदर ठिकाणी धुरीकरण फवारणी सुरू केली आहे.
आपला
विसाजी लोके