आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रायगड :-इर्शाळवाडी येथे दरड दुर्घटना बाधित बांधवांना CMS छत्रपती मराठा साम्राज्य टीम कडून मदतीचा हात.

पत्रकार अनिता शिंदे ( महाराष्ट्र राज्य महिला संघटक ):-8856097134

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483.

 पत्रकार अनिता शिंदे ( महाराष्ट्र राज्य महिला संघटक )

आज CMS छत्रपती मराठा साम्राज्य टीम इर्शाळवाडी (रायगड) येथे दरड दुर्घटना बाधित बांधवांना ज्यांचे सर्व घर आणि प्रत्येकाचा कुटुंबातील निम्या पेक्षा जास्त माणसे मृत पावलेत. त्यातील जे बांधव सुखरूप आहेत त्यांना आज प्रशासनाने कंटेनर मध्ये स्थलांतरित करण्यात आले त्यांना सर्व आवश्यक साहित्य घेऊन टीम पोचली तेथील घराची अवस्था खूपच बिकट आहे. सातारा वरून मदत घेऊन आले समजले की सर्व स्थानिक बांधव खूपच भावूक झाले. एक बांधव यांनी स्वतः आपले मनोगत मांडले त्यानं बांधवांचे घरातील ७ माणसे अजूनही सापडले नाहीत. आज प्रशासनाने सर्वांना मृत घोषित केले आहे. तरीही स्वतः सोबत गावातील सर्वांना धीर देऊन पुन्हा नव्याने उभे राहण्याची जिद्द सर्वांचे दिसली , लहान मुले , स्त्रिया कोण आई वडलांना शोडत आहे. कोण आपल्या मुलांना जे राहिले ते सर्व एकत्र येऊन आता नव्याने एकत्र येऊन वास्तव्य करत आहेत त्यांना आमचा सर्वांमर्फत झालेली छोटीशी मदत पण थोडासा आधार देऊन गेली. प्रशासकीय अधिकारी आणि स्वतः प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले सर आणि जिल्हाधिकारी योगेश मसे सर तसेच रायगड पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे यांनी सर्व टीमच्या निस्वार्थी कार्याचे कौतुक केले. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख OSD to CM मंगेश_चिवटे सर स्वतः उपस्थित राहून संपूर्ण साहित्य वाटप करण्यात मदत केली व योग्य गरजू बांधवा पर्यंत सर्व साहित्य पोचवण्यात मदत केली. या वेळेस CMS टीम मधून ओंकार देशमुख संदीप नवसुपे जयश्रीताई शेलार मॅडम अमृत शिंदे कैलास बाकले अभिजित जाधव शुभम महामूलकर अजय पाटील निलेश देशमुख आदर्श शिर्के रोहन माने हे बांधव उपस्थित होते हे सोडून सातारा मधून हिरकणी फाउंडेशन , सातारा innerwheel क्लब , सातारा कोविड डिफेंडर आणि सातारा मधून असंख्य बांधवांनी साहित्य एकत्र करून सुपूर्द केले होते. सर्वांचा सहकार्याने आज गरजू बांधवा पर्यंत साहित्य पोच करण्यात आले.
जय शिवराय 🚩

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button