सातारा:-साताऱ्यात महामार्ग ते औद्योगिक वसाहतीत रस्त्यावर खड्ड्यांचे राज्य.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यात महामार्ग ते औद्योगिक वसाहतीत रस्त्यावर खड्ड्यांचे राज्य.
सातारा दि: पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग नजीक सातारा खेड हद्दीतील बॉम्बे रेस्टॉरंट येथून जाणाऱ्या रस्त्यालगत खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यातूनच औद्योगिक वसाहतीकडे मार्गक्रमण करताना वाहन चालकांना हे राज्य कोणाचे असा मार्मिक प्रश्न पडत आहे .
याबाबत माहिती अशी की ,छत्रपती दादा महाराज महामार्ग पूल असे नामकरण झालेल्या या पुला नजीकच औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाला मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर त्याही पुढे गेल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आहे. या भवन मध्ये अनेक शासकीय कार्यालय आहेत. परंतु या भवनच्या प्रवेशद्वाराजवळही मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.
या रस्त्यातून जाताना वाहन चालकाचे चलबिचल होत होऊन अपघात झालेले आहेत आणि या अपघातामुळे अनेकांना वाहनाची दुरुस्ती व स्वतःच्या शरीरावर उपचार करावे लागत आहे. सदर खेड ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या या भागामध्ये दोन आमदार आहेत. त्याचबरोबर सत्ताधारी व विरोधी पक्षाचेही आमदार खासदार आहेत. तरीही या रस्त्याची अवस्था अत्यंत केविलवाणी झालेली आहे. या रस्त्याबाबत अद्यापही राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या स्थानिक नेत्यांचे लक्ष नाही.
याच रस्त्या नजीक राजकीय पक्षाच्या जिल्हाप्रमुखाचे कार्यालय आहे. घटना घडल्यानंतर त्याचा निषेध व्यक्त करणे. या कामासाठी सर्वजण तत्पर असतात परंतु ज्या ठिकाणी दररोज कामगारांची वर्दळ असते. अशा औद्योगिक वसाहतीचा रस्ता दुरुस्त व्हावा. अशी मनस्वी इच्छा कोणाची दिसत नाही. असं दुर्दैवाने म्हणावे लागत आहे .
सदरच्या रस्त्याची तातडीने उपाय योजना केल्यास त्याचा फायदा स्थानिक उद्योजक व कामगारांना होणार आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था दूर व्हावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते अमोल गंगावणे, कामगार नेते व रिपब्लिकन पक्षाचे मदन खंकाळ, उद्योजक महेश काळे, जॉन खुडे, संजय खुडे यांनी यांनी केली आहे.
—————————————————&&——————
फोटो – साताऱ्यात महामार्ग ते औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे (छाया- अजित जगताप,सातारा)