ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पनवेल:-काँग्रेसच्‍या तंत्रज्ञान कौशल्य विकास विभागाच्‍या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी रमझान शेख यांची निवड.

पत्रकार कुंदा भोपी ( महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष ):-8689946799

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार कुंडा भोपी ( महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष )

काँग्रेसच्‍या तंत्रज्ञान कौशल्य विकास विभागाच्‍या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी रमझान शेख यांची निवड.

पनवेल:-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विकास विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी रमझान शेख यांची नियुक्ती 15 जुलै 23 रोजी काँग्रेस भवन पनवेल येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली आहे. त्याच सोबत समीर शेख यांची कोकण उपाध्यक्ष पदी निवड केली गेली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांच्या मान्यतेने व विज्ञान तंत्रज्ञान व कौशल विकास विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश यादव यांनी रमझान शेख यांची STS महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे जाहीर करून निवड पत्र देण्यात आले. रमजान शेख यांच्यासह 90 कार्यकर्त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान कौशल विकास विभागामध्ये प्रवेश केला.
पनवेल येथील काँग्रेस भवनात काँग्रेस विभागातर्फे रोजगार मेळाव्याचे व काँग्रेस कार्यकर्ता पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (STS) प्रदेशाध्यक्ष सुरेश यादव जी, पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष निर्मला म्हात्रे, युवा शहर जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे,कोकण विभागीय अध्यक्ष मुसादिक मोडक, जी.आर.पाटील,यांच्या हस्ते निवड पत्र यांना देण्यात आले.
या प्रसंगी नंदराज मुगाजी तालुका अध्यक्ष, स्वप्निल पवार,अभिजीत मुंडोकल, सोनिया सहोता, वंदना सातपुते , चंद्रकला नायडू,शशिकला सिंह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रमझान शेख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की मा.सोनिया जी गांधी, राहुल जी गांधी, मल्लिकार्जून खरगे साहेब, नानाभाऊ पटोले,साहेब यांचे विचार सर्वसामान्य नागरिक व युवक विद्यार्थी यांच्या प्रति विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कौशल्याचे विविध उपक्रम राबवून माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांच्या विचारतील कार्य आपण पुढे घेऊन जाणार आहोत ,अशी प्रतिक्रिया दिली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button