ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज्य रॅलीने माढा मतदारसंघात प्रस्थापितांना घ्यावी लागेल नोंद.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज्य रॅलीने माढा मतदारसंघात प्रस्थापितांना घ्यावी लागेल नोंद.

वडूज दि: सर्वसामान्य व सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांना केंद्रबिंदू मानून वाटचाल करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे निर्माते व राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर ते फलटण या जनस्वराज्य रॅलीचे खटाव तालुक्यातील वडूज नगरीत आगमन झाले. यावेळी फटाक्याची अतिशबाजी व घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य रॅलीने प्रस्थापितांना नोंद घ्यावी लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.
माढा लोकसभा मतदार संघामध्ये सर्वाधिक निर्णयाक ताकद ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या कप बशी ची आहे .आतापर्यंत राजकारणामध्ये सत्तेच्या जवळपास पोचवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने त्यागाची भूमिका घेतली आहे. परंतु, अलीकडे राजकीय समीकरण बदलत आहेत. सत्तेसाठी उलटा पालट झाली असून राष्ट्रीय समाज पक्ष हा तत्वनिष्ठ व विचारावर आधारित असल्याने या जनस्वराज्य रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी जन स्वराज्य रॅलीच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला आहे . माढा लोकसभा नव्हे तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेऊनच वाटचाल करावी लागेल. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक निर्णय घेण्यात पण सक्षम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या रॅलीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते काशिनाथ शेवते, बाळकृष्ण लेंगरे, अजित पाटील, खंडेराव सरक, माऊली सलगर श्रीकांत देवकर, सचिन इंगळे, डॉ. रमाकांत साठे, निखिल इंदापुरे संदीप बनसोडे त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश ,अजित नलावडे, ज्येष्ठ नेते कृष्णाराव बनसोडे, विश्वास नाना इंगळे ,शशिकांत देवकर, सचिन इंगळे, प्रमोद पावडे,रणदिवे यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते .
प्रारंभी वडूज नगरीमध्ये फटाक्याच्या आतिषबाजीने सातारा जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, वडूज अध्यक्ष निखिल इंदापुरे यांनी मानाचा फेटा व पुष्पहार घालून राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे हलगीच्या निनादांमध्ये स्वागत केले. या वेळेला फटाक्याच्या सलामीने व घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. दोन दिवसाच्या या जनस्वराज्य रॅली निमित्त पंढरपूर मोडनिंब, शेटफळ, टेंभुर्णी, नरसिंगपूर, अकलूज, माळशिरस ,पिलीव, सांगोला, आटपाडी, देवापूर विरकरवाडी, गोंदवले, दहिवडी, वडूज, खटाव, पुसेगाव, डिस्कळ, वाखरी व फलटण असा प्रवास करून फलटणमध्ये या जलस्वराज्य रॅलीचा समारोप करण्यात आला.फलटण या ठिकाणी या ठिकाणी जाहीर सभा यशस्वीरित्या पार पाडली. या दोन दिवसाच्या रॅलीने राष्ट्रीय समाज पक्षाची कपबशी घरोघरी पोहोचली आहे . आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष यश संपादन करील. असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे .
——————————————————

छाया -वडूज खटाव या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांचे स्वागत करताना जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर व मान्यवर (छाया अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button