ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-यवतेश्वर घाटातील डोंगर माथ्यावरील दगड बाजूला करण्याची मागणी.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अजित जगताप सातारा

यवतेश्वर घाटातील डोंगर माथ्यावरील दगड बाजूला करण्याची मागणी.

सातारा दि: पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेल्या सातारा तालुक्यातील कास पठार परिसरातील यवतेश्वर व सांबरवाडी गावानजीक डोंगर माथ्यावर दगड आहे. या दगडाची झीज झाली असून केव्हाही हा दगड कोसळला तर दुर्घटना घडू शकते .त्यामुळे सदरचा दगड नष्ट करण्याची मागणी यवतेश्वर सरपंच संजय पवार व सांबरवाडी सरपंच सौ. माधुरी फडतरे यांनी केली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आज सायंकाळी साडेसात वाजता आपत्ती व्यवस्थापन बाबत घेण्यात येणाऱ्या प्रशासकीय काळजीबाबत माहिती पत्रकार परिषदेत दिली. याचवेळी यवतेश्वर सरपंच संजय पवार, सांबारवाडी सरपंच सौ माधुरी फडतरे व कुमारी मधुरा फडतरे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
योगेश्वर रस्त्यावर वीस बाय दहा आकाराचा मोठा महाकाय दगड असून या दगडामुळे पावसाळ्यात दगड घसरल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते .त्यामुळे चिंतेत असलेल्या ग्रामस्थांच्या वतीने सरपंच यांनी निवेदन दिलेले आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की, पर्यटन वाढीसाठी चालना मिळत असली तरी काही पर्यटकांच्या हुल्लडबाजी व रिकामा बाटल्या फेकणे तसेच रस्त्यावर लघु शंका करणे. दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी उलटी करणे या गोष्टींमुळे स्थानिकांना त्रास होत आहे. त्याबाबतही पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे .

____________________________________

छाया – यवतेश्वर येथील धोकादायक दगड नष्ट करण्याचे निवेदन देताना सरपंच श्री पवार व सौ फडतरे, कुमारी मधुरा( छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button