ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मावळ :-पारंपारिक पद्धतीने गौरी- गणपती विसर्जन

प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मावळ :-पारंपारिक पद्धतीने गौरी- गणपती विसर्जन.

ठाकूरसाई- पवन मावळात आज पारंपारिक पद्धतीने गौरी गणपती विसर्जन करण्यात आले. पवन मावळतील बहुसंख्य गणपतीचे विसर्जन माहेर वाशिन म्हणून आलेल्या गौराई सोबत करण्याची परंपरा आहे. सर्वप्रथम ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये लहान मुले, मुली, महिला, पुरुष, तसेच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होता. महिलांनी गौराईची फेरावरची गाणी, झिम्मा, फुगडी, आणि विविध कला सादर करून सर्वांनी आनंदात आपल्या बापाला आणि गौरीला निरोप दिला. एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला.
दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधामुळे कुठल्याही प्रकारचे सण उत्सव साजरे करता न आल्याने यावर्षीचा सर्वांचा उत्साह आणि आनंद द्विगुणीत झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उदरनिर्वाहासाठी गावाबाहेर गेलेल्या गावातील तरुण या उत्सवासाठी गेली पाच ते सहा दिवसांपासून गावातच येऊन राहिल्याचेही पाहायला मिळाले. यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दंगून गेल्याचे पाहायला चित्र बघायला मिळाले. ठाकुरसाई, गेव्हंडे खडक, मोरवे चावसार शिळीब अजिवली या परिसरातील गणपती पवनाधरण काठी तर काले, पवनानगर, कोथूर्ण, या नधी किनारील गावातील गणपतींचे विसर्जन पवना नदी तीरावर करण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button