चित्रपट सुष्टीचे जनक दादासाहेब फाळके विचार मंच महाराष्ट्र व कमल फील्म प्रोडक्शन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार 2022 जाहीर
प्रतिनीधी:- महेश मोहिते सातारा

चित्रपट सुष्टीचे जनक दादासाहेब फाळके विचार मंच महाराष्ट्र व कमल फील्म प्रोडक्शन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार2022 जे.आर.फील्म प्रोडक्शन चे निर्माते दिग्दर्शक व ऑल इंडिया सिने वर्कर असोशेशन चे सातारा जिल्हा अध्यक्ष. मा. जीवन मोहिते यांना परशुराम सायखेड नाट्यगृह नाशिक येथे प्रधान करण्यात आला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे राजश्री तुडयेकर उद्योजिका व समाज सेविका तसेच सिने अभिनेत्री सोनाली रावळ.आखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ चे बाळासाहेब गोरे.विश्वसुंदरी 2021नुतन मिस्त्री.तेंलगु व मराठी चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक सोमनाथ मुठाळ.अध्यक्ष सुनील मोंढे.व इतर मान्यवर उपस्थित होते.जिवन मोहिते सर यांना राज्य स्तरीय कलावंत पुरस्कार प्राप्त झाल्याने त्याचे अभिनंदन बहुजन समाज विकास ट्रस्ट महाराष्ट्र चे अध्यक्ष बत्तु मोहिते साहेब सचिव दिलीप घाडगे संपर्क प्रमुख सोमनाथ सुतार संचालक निवास लोखंडे.RPI मातंग आघाडी तालुका अध्यक्ष महेश मोहिते तसेच कलावंत प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचे पदाधिकारी विविध सामाजिक.कला संघटना यांनी त्यांचे अभिनंदन केले . मा.जीवन मोहिते हे जे.आर.फिल्म प्रोडक्शन चे निर्माते दिग्दर्शक आहेत त्यांनी चित्रपट.वेबसिरीज.शार्टफिल्म.केल्या असून टीव्ही मालिकात अभिनय करत असतात या क्षेत्रात अभिनेता.लेखक.उत्तम दिग्दर्शक या भूमिका पार पाडत असून त्यांच्या कौशल्य कार्याची दखल घेऊन त़्यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे. मोहिते सर यांना सामाजिक शैक्षणिक व कला क्षेत्रात कार्यरत असतात त्यांना अनेक जिल्ह्य राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत मोहिते सर ऑल इंडिया सिने वर्कर असोशेशन सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत व प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच बहुजन समाज विकास ट्रस्ट महाराष्ट्र चे कार्य अध्यक्ष व पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असूनअनेक सामाजिक संघटना राज्य जिल्हा पदाधिकारी म्हणून काम करत आहेत