सातारा लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटातून चंद्रकांत जाधव यांना हिरवा कंदील?
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटातून चंद्रकांत जाधव यांना हिरवा कंदील?
सातारा दि: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या सत्तेची वर्षपूर्ती केली .तसेच सातारा जिल्ह्यामध्ये ही मजबूत पकड ठेवली आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक चंद्रकांत जाधव यांची लोकसभा उमेदवारी साठी वर्णी लागणार असून त्यांना पक्षश्रेष्ठीकडून हिरवा कंदील? मिळाल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत अद्यापही निर्णय झाला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्हात त्यांना अस्तित्व निर्माण करण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात१८ लाख २३ हजार ४७६ मतदार आहेत त्यामध्ये पुरुष ९ लाख ३५ हजार ८७८ व महिला ९ लाख ३ हजार ९२ अशा आहेत. शिवसेना पक्षाला मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघात आहे. त्यांना नेतृत्वाची गरज होती. ती नेतृत्वाची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थकांचे पारडे जड वाटत आहे. सातारा लोकसभे साठी यापूर्वी माथाडी कामगार नेते व शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांना ४ लाख५२ हजार ४९८ मते मिळाली होती तर २००९ साली पुरुषोत्तम जाधव यांना २ लाख ३५ हजार ६८ मते मिळाली होती. दोन्ही वेळेला धनुष्य बाण हे चिन्ह होते.आता या मतांमध्ये विभागणी झाली असली तरी भाजप, राष्ट्रवादी गट व शिवसेना गट असे ट्रिपल इंजन लाभल्यामुळे शिंदेशाही शिवसेनेला खासदारकीला विजय होण्याची स्वप्न पडू लागलेली आहेत. त्यामुळे चंद्रकांत जाधव व पुरुषोत्तम जाधव या पैकी एका शिवसैनिकांना संधी मिळावी असा सूर उमटत आहे . शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार आक्रमक भूमिका घेणारे साताऱ्यातील शिवसैनिक व जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेच्या वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, नरेंद्रदादा पाटील, दीपक पवार, बाळासाहेब बाबर, पुरुषोत्तम जाधव, हनुमंतराव चवरे ,संजय मोहिते अशा मातब्बर सेना नेत्यांसोबत काम केलेल्या चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आहे.
कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती आहे .वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, सातारा तालुक्यात त्यांचा वाढता संपर्क असून त्यांना संधी मिळाल्यास ते लोकसभेत निवडणूक सहज जिंकू शकतील. असा विश्वास काही सेना नेत्यांना वाटू लागलेला आहे. शेवटी आक्रमक चेहरा व पक्षासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी. या अपेक्षेनेच सध्या चंद्रकांत जाधव यांचे नाव चर्चिले जात आहे. त्यांना वाढता पाठिंबा मिळणार अशी अपेक्षा आहे.नक्कीच सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलू शकतात असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एका सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे क्रांती करतील. त्याचा फायदा पुढील राजकारणात होईल असे मनोगत जेष्ठ शिवसैनिक विजय पाटील यांनी व्यक्त केले आहे.
—&&————————————————
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव