खटाव:-संत सद्गुरु सरुताई यांचा महिमा सर्वदूर पसरला – भक्तांची संख्या वाढली – मा.आ.दिलीपराव येळगावकर
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा
संत सद्गुरु सरुताई यांचा महिमा सर्वदूर पसरला – भक्तांची संख्या वाढली – मा. आ.दिलीपराव येळगावकर.
मायणी प्रतिनिधी— मायणी येथील संत सद्गुरु सरुताई माऊलींचा महिमा सर्वदूर पसरत आहे,दिवसेंदिवस भक्तांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे असे उद्गार ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बोलताना काढले. यावेळी समाजभूषण हणमंतराव साळुंखे पतसंस्था कलेढोण चे चेअरमन संजीव साळुंखे,सातारा जिल्हा लिंगायत तेली बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लोखंडे,सचिव रविंद्रशेठ बाबर,जालिंदर माळी,अंकुश रजपूत,किरण माळी,विजयराव कवडे,सतीश भोसले,पांडुरंग लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ.दिलीपराव येळगावकर व त्यांच्या पत्नी सौ.उर्मिला येळगावकर यांच्या व मान्यवरांच्या हस्ते सद्गुरु सरुताई माऊली यांची महाआरती करण्यात आली.यावेळी ह.भ.प.जयवंत वाघमारे यांचे किर्तन,सिद्धनाथ भजनी मंडळ सांगोले व महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. १लाख२१हजाराची देणगी दिल्याबद्दल हणमंतराव तापोळे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.येळगावकर म्हणाले,सद्गुरु सरुताई यांच्या मठाच्या परिसरात प्राथमिक व माध्यमिक शाळा,गोशाळा,भक्तनिवास अशा सोयी आहेत.लवकरच या परिसरात महाविद्यालय उभे करण्याचा मनोदय आहे. मायणी ला तीर्थक्षेत्रा चा क वर्ग दर्जा आहे तो ब वर्ग दर्जा मिळवून देणार आहे.१९ वर्षे कोर्ट कचेऱ्या करुन हायस्कूल ला अनुदान मंजूर झाले आहे. असे सांगून खटाव माण परिसरात पावसाचे आगमन व्हावे अशी प्रार्थना सद्गुरु सरुताई यांच्या चरणी केली. यावेळी पत्रकार दिलीप पुस्तके,तानाजी चव्हाण,विशाल चव्हाण,सतीश डोंगरे तसेच असंख्य भक्त उपस्थित होते. पत्रकार पांडुरंग तारळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. —