खटाव:-चिंचणी गावचे सुपुत्र ऑनरेरी लेफ्टनंट विश्वनाथ निकम सेवानिवृत्ती निमित्त भव्य नागरीक सत्कार.
पत्रकार गोरख जाधव खटाव:-9822626206

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
- पत्रकार गोरख जाधव खटाव
चिंचणी गावचे सुपुत्र ऑनरेरी लेफ्टनंट विश्वनाथ निकम सेवानिवृत्ती निमित्त भव्य नागरीक सत्कार.
माजी जलसंपदामंत्री आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार. प्रभाकर घार्गे,माजी सदनी अधिकारी. प्रभाकर देशमुख,मान तालुका पत्रकार संघाचे संस्थापक बापूसाहेब गुंजवटे , चिंचणी गावचे सरपंच सुनिल घोरपडे , आर्मी आजी माजी संघटणा चिंचणी तसेच पंचक्रोशीतील इतर मान्यवर उपस्थित. विश्वनाथ निकम ह्यांना लहानपणा पासून आर्मीत जाण्याची इच्छा होती. विश्वनाथ निकम हे शेतकरी कुटुंबातील होते. 1988 ला आईच्या निधनानंतर हालाकीचे दिवस निर्माण झाले. तरिही खचले नाहीत. 1993 ला त्यानी 10 वी उत्तीर्ण केल्यानंतर शेती व दुग्धव्यावसाय करत आर्मीत जाण्यासाठी तयारी चालू केली.1995 ला आर्मी भरतीला गेले व ते आर्मी भरती ही झाल्यानंतर
27 जानेवारी 1995 joining झाले. 1996 ला वडिलांचे निधन झाले त्यांची पहिली पोस्टींग अरूनाचल प्रदेशला झाली .त्यानंतर कारगिल, राजस्थान , सिकीम अशा विविध टिकानी पोस्टींग झाली. त्याचप्रमाणे सियाचिन ग्लेसियर 2019 ला5 महिने 16,000 फुट उंच ठिकाणी पोस्ट चे नेतृत्व केले. त्या ठिकाणी असनारे ( _40॰c) तापमान च्या ठिकाणी मोजके सैनिक आणि जीवनावश्यक साहित्य घेऊन सिमेवर रक्षण करीत होते. 5 महिने घरच्यां संपर्क नव्हता . जगातील सर्वात उंच युध्द क्षेत्र मानले जाते.गलवान घाटी विवाद दोरान 17500 फुट उंच रिजांगला टाॅप वर तैनात होते. अशा विविध ठिकाणी देश सेवा केली .1जुलै 2023 ला सेवानिवृत्त झाले.