खटाव:-व्हॉईस ऑफ दि मीडिया संघटनेच्या खटाव तालुका अध्यक्षपदी लोकमतचे प्रतिनिधी राजीव पिसाळ यांची निवड.
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पुसेसावळी: महाराष्ट्रातील पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेचे नाव घेतले जाते. राज्यात पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या या संघटनेची खटाव तालुका कार्यकारणी तालुकाध्यक्ष राजीव पिसाळ यांनी जाहीर केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभयकुमार देशमुख, जिल्हाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष नलवडे यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
जिल्हाध्यक्ष विशाल पाटील म्हणाले, व्हाईस ऑफ मीडिया ही 50 ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना असून भारतातील 17 राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. पत्रकारांची हीत जपणारी संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मिडीयाकडे पाहिले जाते. राजकारणामध्ये न अडकता पत्रकारिता आणि पत्रकारांना सक्षम करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून घडत आहे. पत्रकारांना त्यांची स्वतःची घरे उपलब्ध करून देणे, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, आजारपण, अपघात किंवा इतर संकटकाळी पत्रकारांना आधार देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे.
खटाव तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे :-तालुकाध्यक्ष- राजीव पिसाळ (लोकमत), कार्याध्यक्ष – सर्फराज बागवान (तरुण भारत), उपाध्यक्ष – मारुती पवार (जनमत), उपाध्यक्ष- सुहास शिंदे (सकाळ ), सरचिटणीस- प्रकाश सुरमुख (पुण्यनगरी), सहसरचिटणीस – शशिकांत धुमाळ (सकाळ), खजिनदार /कोषाध्यक्ष – अनमोल गुरव (RPS स्टार न्युज), कार्यवाहक: केशव जाधव (लोकमत), संघटक: तुषार माने (प्रभात), प्रसिद्धी प्रमुख – पद्मनिल कणसे (पुढारी), सदस्य – अंकुश चव्हाण( सकाळ ).