कोल्हापूर:-अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने भाविकांना फराळ वाटप.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने भाविकांना फराळ वाटप.
कोल्हापूर: प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमीत्त नंदवाळ येथे लाखो भाविकांची मांदियाळी गुरूवारी दि. २९ रोजी विठ्ठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जमली. या ठिकाणी अनेक स्वंयसेवी संघटनानी विवीध प्रकारे भाविकांची सेवा केली असून अखिल भारत हिंदू महासभा आणि अखिल भारत भ्रष्टाचार, अत्याचार जनआंदोलनाच्यावतीने फराळाचे वाटप करण्यात आले.
नंदवाळात आलेल्या भाविकांना शाबू चिवडा आणि बटाटे वेपर्स हे उपवासाचे पदार्थ देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष संदीप सासने, शिला माने, अविनाश शेला, शोभा शेलार, अपर्णा सावंत, वर्षा शिंदे, सुनिता भोसले, विनोद चोपडे, योगेश पोवार, अनिकेत शिंदे, सुलभा कस्तुरे आदी यावेळी उपस्थित होते.
कोल्हापूर: प्रतिपंढरपुर असणाऱ्या नंदवाळ येथे भाविकांना फराळ वाटप करताना अखिल भारतीय हिंदू महासभा आणि अखिल भारत भ्रष्टाचार, अत्याचार जनआंदोलनाचे पदाधिकारी
…..