लोणी प्रवरा:-दिग्गज आदिवासी नेते एकत्र, राजकीय वर्तुळात खळबळ.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

दिग्गज आदिवासी नेते एकत्र, राजकीय वर्तुळात खळबळ.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आदिवासी चळवळीत सक्रिय असणारे सर्व दिग्गज आदिवासी नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येऊन खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण हे आदिवासी समाजावर बऱ्याच अंशी निर्धारित आहे कारण जिल्ह्यात आदिवासी समाजाचे निर्नायक मतदार आहेत. ज्या बाजूने आदिवासी मतदार कौल देतील त्या बाजूचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या मतदारांना खूप महत्त्व आहे. सध्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा झाली आहे आणि त्यातच सर्व आदिवासी नेते एकत्र आल्याने चर्चेला उधाण आले आहे .आदिवासी चळवळीमध्ये सक्रिय असणारे दिग्गज आदिवासी नेते एकत्र येऊन आदिवासी बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. आदिवासींची चळवळ चालवणारे दिग्गज आदिवासी नेते एकत्र आल्याने राजकीय समीकरणे नेमकी कोणत्या दिशेला जातात हे पाहणे औचित्त्याचे ठरणार आहे . राज्यात आदिवासी चळवळीमध्ये सक्रिय असणारे एकलव्य भिल्ल सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे, विद्रोही आदिवासी महासंघाचे संस्थापक दिलीपराव बर्डे,आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष कैलासदादा माळी, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे अध्यक्ष रेवन्नाथ जाधव, तंटा तात्या क्रांती फोर्सचे अध्यक्ष बाळासाहेब गांगुर्डे, आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भंगड, राधाकृष्ण बर्डे, भाऊराव अहिरे, चंद्रकांत धिरोडे, संजय गांगुर्डे, राजेंद्र बर्डे, रोहिदास बर्डे, शिवाजी जाधव, कृष्णा सोले, अनिल जाधव, रामनाथ बर्डे, सुदाम माळी, कृष्णा गोधडे, गेणु माळी, रोहिदास बर्डे, लाला मोरे, विजय पवार, राजेंद्र पिंपळे, सुनील बर्डे, नवनाथ बर्डे, चंद्रकांत रोकडे, मच्छिंद्र बर्डे, मच्छिंद्र जाधव, सनी अहिरे असे आदिवासीचे दिग्गज नेते एकत्र आल्याने आदिवासी नेमके कुणाला कौल देतात की मतदानावर बहिष्कार टाकतात याकडे जिल्ह्यातील राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. रविवार २३ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे आदिवासी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीमध्ये आदिवासींच्या प्रश्नावर सखोल चर्चा होणार आहे. तसेच आदिवासी बचाव समितीच्या सदस्यांची घोषणा देखील बैठकीत केली जाणार आहे. त्यामुळे आदिवासी नेत्यांनी केलेली एकजूट आदिवासी मतदारांना नेमके कोणत्या बाजूने घेऊन जाते. व आदिवासी हीताचे कोणते निर्णय या बैठकीत घेतले जातात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.




