फलटण:-राज्यस्तरीय आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा पुरस्कार व जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार २०२४ जाहीर.
पत्रकार अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अशितोष चव्हाण
RPS STAR NEWS
राज्यस्तरीय आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा पुरस्कार व
जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार २०२४ जाहीर.
जिल्हा सातारा
( वर्ष – ५ वे )
(आई प्रतिष्ठान राज्यस्तरीय वाचन प्रेरणा पुरस्कार हा विद्यार्थ्यांसाठी आणि जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार शिक्षकांसाठी दिला जाणार आहे)
नमस्कार 🙏🙏
सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींना कळविण्यात येते की, आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित
आई सन्मान पुरस्कार -2024 वितरण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. हा पुरस्कार शैक्षणिक ,सामाजिक, क्रीडा , वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सालाबाद प्रमाणे यावर्षीही दिला जाणार आहे ,तरी आपली माहिती 31 जुलै 2024अखेर खालील नंबर वर व्हाट्सअप द्वारे Pdf स्वरूपात सविस्तर पाठवावी.
मोबाईल नंबर – गणेश तांबे -9890628720.
*पुरस्काराचे निकष*
✒️ १)शिक्षणसेवक, उपशिक्षक,पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख माहिती पाठवू शकतात.( संपूर्ण नाव, शाळा, एकूण सेवा , सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे फोटो,मिळालेले पुरस्कार, पुस्तक प्रकाशन, लेखन , छंद, वृक्षारोपण (आपल्या जडणघडणीमध्ये आईंचे महत्व सविस्तर माहिती लिहिणे ) वरील सर्व माहिती बनवून Pdf स्वरूपात पाठवावी.
✒️२)चालू वर्षातील जुलै महिन्यातील नव्याने २० वृक्षारोपण केल्याचे फोटो.. (लावलेल्या झाडांची नावे लिहावीत)
✒️ ३) आपल्या शाळेमध्ये अथवा गावातील किंवा नजीकच्या वाचनालयात प्रेरणादायी 20 पुस्तके भेट स्वरूपात दिले असल्याचे संबंधित प्रमुखाचे पत्र (दिलेल्या पुस्तकांची नावे लिहावीत)
✒️४) विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी (शिष्यवृत्ती नवोदय ,सैनिक स्कूल )आपण राबवत असलेले उपक्रम
इ.*pdf file पाठवावी*)
✒️५).पुरस्कारासाठी सेवेची अट नाही.
✒️६) .पुरस्काराचे स्वरूप – सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फेटा, पुस्तक, गुलाबपुष्प, इ. असेल.
✒️७) पुरस्कार निवड ही गुणांकनानुसार, निवड समिती मार्फत केली जाईल. त्यामुळे निवड यादी जाहीर केल्यानंतर कोणीही फोन करू नये.
🌹 *आपले नम्र* 🌹
*श्री.गणेश तांबे (अध्यक्ष)*
*सौ. जयश्री तांबे.( सचिव)*
*सर्व पदाधिकारी,आई प्रतिष्ठान* *वाठार निंबाळकर ता. फलटण, जि. सातारा*