ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-भाजप वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्याच्या वेळी साताऱ्यात भाजप खासदार- आमदारासमर्थकांत खडाजंगी.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अजित जगताप सातारा

भाजप वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्याच्या वेळी साताऱ्यात भाजप खासदार- आमदारासमर्थकांत खडाजंगी.

सातारा दि: सातारा तालुक्यातील खिंडवाडी येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या जागेचा वाद चांगला पेटला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे भाजप उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातारा जिल्ह्याच्या नियोजित दौऱ्यातच भाजपचे राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी चांगलीच शाब्दिक खडाजंगी केली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान याबाबत सातारा जिल्हा पोलिस यंत्रणेने जास्तीत जास्त कडक कारवाई करावी. अशी मागणी शांतता प्रिय नागरिकांनी केलेली आहे .सातारा तालुक्यातील खिंडवाडी या ठिकाणी शेती उत्पन्न बाजार समितीची जागा आहे तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मालकीची ही जागा आहे. या जागेचा वाद विकोपाला गेला असून आज सकाळी खासदार व आमदार नेते व समर्थक एकमेकांच्या समोर उभे राहिले. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक यांच्या मधोमध पोलीस यंत्रणा उभी राहिल्याने खूप मोठा अनर्थ टाळला. विशेष म्हणजे जागेचा वाद हा खाजगी असला तरी त्याला सातारा जिल्ह्यातील बिकट प्रश्नाचे स्वरूप आले होते. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती .दरम्यान काही जागेबाबत न्यायप्रविष्ठ बाब असलेने याबाबत फारसे कोणी बोलण्यात उत्सुक नसल्याचे दिसून आले आहे.
______________________________________
फोटो _खिंडवाडी. येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेच्या वादाच्या वेळी खासदार व आमदार दिसत आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button