खटाव :-चोरीचा मुद्देमाल वडूज पोलीस मार्फत फिर्यादी यांच्याकडे सुपूर्द,,,
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
चोरीचा मुद्देमाल वडूज पोलीस मार्फत फिर्यादी यांच्याकडे सुपूर्द,,,
वडूज दि: सध्या चोरीचे प्रमाण वाढत असून खबरदारीचे उपायोजना केल्यानंतर चोऱ्या होत नाहीत. याची जाणीव ठेवून नागरिकांनीही कर्तव्य बजावले पाहिजे. अन्यथा चोरी होणारच पण या थोडक्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करण्यामध्ये एवढच पोलिसांनी सुद्धा प्रयत्न केले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
याबाबत माहिती अशी की खटाव तालुक्यातील पेडगाव रस्ता या ठिकाणी सराईत चोरट्यांनी घरफोडी करून पाच लाख चार हजार रुपयाच्या चोरीचा मुद्दाम पळून गेला होता .
याबाबत दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी फिर्यादी कृष्णा विठोबा करमारे रा वडूज ता खटाव यांनी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार वडूज पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली व आरोपींना जिरेबंद केले. यामध्ये आरोपींकडून चार लाख चाळीस हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हा मुद्देमाल फिर्यादीची ओळख पटवून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख , परिवक्षधिन उपयुक्त अजय कोकाटे, उपविभागीय अधिकारी अश्विन शेडगे व पोलीस निरीक्षक अमोल माने, प्रतिभा कदम, दीपक देवकर यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
_________________________
फोटो -फिर्यादी यांना चोरीला गेलेला मुद्देमाल सन्मानाने परत देताना पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी दिसत आहेत (छाया -अजित जगताप -सातारा)