सातारा :-माण तालुक्यात भाजपा आ.गोरे यांच्याशी फराकत घेऊन अनेक कार्यकर्ते श्री शेखर गोरे गटात.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
माण तालुक्यात भाजपा आ .गोरे यांच्याशी फराकत घेऊन अनेक कार्यकर्ते श्री शेखर गोरे गटात.
सातारा दि: सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात धावून जाणारे शिवसेना सातारा जिल्हा नेते श्री. शेखर गोरे यांच्या मानवतावादी दृष्टिकोन व त्यांनी केलेल्या सहकार्याची जाणीव ठेवून कुळकजाई ता.माण येथील भाजप आ. जयकुमार गोरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेचे श्री. गोरे गटात प्रवेश केला व हाती मशाल घेतली .
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते श्री शेखर गोरे यांनी राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये लक्ष केंद्रित केलेले आहे . माण -खटावच्या जनतेला दिलासा देण्याचे काम श्री. शेखर गोरे हे इमाने इतबारे करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी त्यांना विजयी होण्यासाठी माण वासियांनी छातीचा कोट केला होता. आजही त्यांच्या कार्याची शिवसेना वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची तयारी सुरू असतानाच भाजप आमदार जयकुमार गोरे गोरे यांच्या बालेकिल्ल्यातील तळ्यातील कमळ दूर जाऊ लागले आहे.
कुळकजाई गावातील अंतर्गत कुरघोडीमुळे अनेक कार्यकर्त्यांनी श्री. शेखर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सामाजिक व राजकीय वाटचाल करण्याची शपथ घेतली. सातारा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे कुळकजाई सरपंच विक्रम जगताप, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र घाडगे, सोसायटी संचालक संतोष घाडगे, रामचंद्र ठोंबरे ,गाडेवाडी जयवंत शिंदे, विजय जगताप, नसरुद्दीन मुलाणी, राजेंद्र मदने, दादा डाळे, पांडुरंग फडतरे, संभाजी चव्हाण यांच्या सह अनेक मान्यवरांनी शिवसेनेचे श्री. गोरे यांची भेट घेऊन यापुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून परिसरातील सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अशी ग्वाही दिली.
या वेळेला अविनाश जगदाळे, बशीर मुलाणी, आप्पासाहेब बुधावले, अमर कुलकर्णी, दीपक कदम, शामराव पवार ,लाला सावंत, विक्रम लावंड आदी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. गेले अनेक दिवसापासून माण – खटाव तालुक्यामध्ये शिवसेनेचे श्री. शेखर गोरे यांनी समाजकार्यातून ज्या गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही त्या गावांमध्ये स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याचे टँकर दिले. अनेकांच्या व्यक्तिगत अडीअडचणीला धावून गेले आहेत तसेच विविध निवडणुकीमध्ये शिवसेनेने घवघवीत यश संपादन केलेले आहे.
या सर्व गोष्टीची जाणीव ग्रामस्थांना झाले असून ज्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे .त्या सर्वांनी श्री. शेखर गोरे यांना माण -खटावचे आमदार करण्यासाठी प्रामाणिकपणे यशस्वी प्रयत्न केले जातील. असे मनोगत व्यक्त केले. या सर्व शिलेदार व शिवसैनिकांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री शेखर गोरे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. यावेळी शिवसेना जिंदाबाद,,,, श्री शेखर गोरे ,आगे बढो हम तुम्हारे साथ है,,,,, अब की बार, श्री शेखर गोरे आमदार,,,,, अशा घोषणाबाजी देऊन श्री. गोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
छाया ====कुळकजाई येथील आ. गोरे गटातून शिवसेनेच्या श्री. गोरे गटाकडे आगेकूच करणारे ग्रामस्थ
,,(छाया= अजित जगताप सातारा)