ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पवनानगर- कोथुर्णे येथील पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो ! अजित पवार.

प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकूर मावळ:-9960044802

पवनानगर- कोथुर्णे येथील पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो ! अजित पवार.
मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावामध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी व मनाला सुन्न करून टाकणारी आहे. या प्रकरणांमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप येऊ देणार नाही तसेच पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो असे विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोथुर्णे येथे पीडित कुटुंबीयांना भेट देऊन सांगितले. खटला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी चांगल्यात चांगला सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी येत्या अधिवेशनामध्ये मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पीडित कुटुंबियांची भेट घेऊन घडलेल्या सर्व घटनेची माहिती घेतली ग्रामस्थांकडून सदर आरोपीने यापूर्वीदेखील अशा प्रकारचा गुन्हा केला होता असे समजल्यावर सर्वांनी सतर्क राहून त्याला त्याच वेळी योग्य ते शासन केले असते तर त्याची परत हिम्मत देखील झाली नसती असेही अजित पवार यांनी ग्रामस्थांना सांगितले. पीडित कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button