खटाव:-भाजप आ.गोरे यांच्यासाठी माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी उचलला दगड,,,,
प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अजित जगताप सातारा
भाजप आ. गोरे यांच्यासाठी माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी उचलला दगड,,,,
(अजित जगताप)
वडूज दि: राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पक्षाचे दोन बलाढ्य नेते खटाव तालुक्यात आहेत .सातारा भाजप जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर हे दोन्ही नेते भाजप पक्षाचे पिलर आहेत. राजकारणातील बदलामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष पाहण्यास मिळाला. परंतु, आता दोन्ही नेत्यांचे एकत्रीकरण झालेले आहे . वडूजात एका कार्यक्रमाच्या वेळेला डॉ. येळगावकर यांनी आ. जयकुमार गोरे यांच्यासाठी दगड उचलला.
वडूज ता. खटाव येथील उद्घाघाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे दोन्ही नेते एकत्र आले होते.
श्रीफळ वाढवताना हातात दगड घेऊन डॉ. येळगा वकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आ गोरे यांच्या समोर श्रीफळ वाढवण्यासाठी दिला. आज श्री बसवेश्वर जयंती, रमजान ईद व अक्षय तृतीय या तिन्ही सणाच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमाला आ. जयकुमार गोरे व डॉ. दिलीप येळगावकर, नगराध्यक्ष मनीषा काळे, वडूजचे माजी सरपंच व नगरसेवक अनिल माळी, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, विश्वास राव गोडसे, काका बनसोडे, विक्रम रोमण, धनाजी चव्हाण, परेश जाधव, विठ्ठल बलशेठवार, विकास गोसावी, जयकुमार शिंदे तसेच वडूज नगरीचे मान्यवर मंडळी उपस्थित होते .
शुभकार्यासाठी श्रीफळ वाढवणे ही भारतीय संस्कृती असून या उद्घाघाटनाला श्रीफळ वाढवण्यासाठी आ. जयकुमार गोरे हे वाकण्यापूर्वीच डॉ. दिलीप येळ गावकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून श्रीफळ व हातात दगड घेतला. त्या पाठीमागे चांगली भावना होती. आ. गोरे यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांनी वाकू नये हातातील दगडावर श्रीफळ वाढवावा अशी त्या मागची भूमिका होती. परंतु आमदार जयकुमार गोरे यांनी वेदना विसरून खाली वाकून श्रीफळ वाढवला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
सध्या राजकीय दृष्ट्या खटाव कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता कोणतेही राजकीय कार्यक्रम नाही. परंतु या उद्घाघाटनानिमित्त सर्व मातब्बर राजकीय मंडळी एकत्र आले होते. या वेळेला अक्षय तृतीय, रमजान ईद व श्री बसवेश्वर जयंती निमित्त एकमेकांना शुभेच्छा देऊन एकमेकांची चौकशी करण्यात आली. तसेच राजकारणामध्ये मतभेद असावेत पण वैर नसावे. असाच संदेश या दोन मातब्बर नेत्यांनी दिला आहे. त्याचे कार्यकर्त्यांनी अनुकरण करावे .अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.
———–&——————————————-&——- फोटो –
वडूज नगरीमध्ये आ. जयकुमार गोरे यांनी श्रीफळ वाढवण्यासाठी हाती दगड घेतले जाते (छाया- सुरेश पोतदार, वडूज)