कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुडाळ:-म्हसवे अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमण जैसे थे, मात्र रस्ता पूर्ण.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

म्हसवे अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमण जैसे थे, मात्र रस्ता पूर्ण.
कुडाळ दि: सर्वसामान्य माणसांना नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतात. एखाद्या कामासाठी मंत्रालय ते पंचायत समिती अशा पद्धतीने मार्गक्रमण करावे लागते. परंतु, मंजूर झालेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याऐवजी रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे ठेवून दुसऱ्या मार्गाने रस्त्याचे काम झाले आहे.याबाबत जावलीचे दस्तुरखुद माजी सभापती तानाजीराव शिर्के व म्हसवे गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य अशोक शिर्के यांनी लेखी तक्रार वजा निवेदन देवून सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी विनंती केली . केल्याची माहिती दिली.
याबाबत माहिती अशी की, जावळी तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले व जागतिक स्तरावर वडाच्या झाडाने नोंद झालेल्या
म्हसवे गावातील अनेक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या ग्रामपंचायत ते चर्मकार वस्ती अशा रस्त्याचे सात लाख रुपयांचे काम मंजूर करण्यात आले. सदरचे काम करताना ठेकेदार यांना स्थानिक पातळीवर दमदाटी सुद्धा झाली. परंतु, पावसाळ्यापूर्वी विकास कामे पूर्ण करण्याचा शब्द देण्यात आल्याने ठेकेदारांची पर्यायी मार्ग काढून रस्त्याचे काम पूर्ण केले आहे.
सदरचे रस्त्याचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी पाहणी करण्यास सुद्धा आले नाहीत. एवढेच नव्हे तर चलता है चलने दो अशा पद्धतीने या रस्त्याच्या कामाबाबत दुर्लक्ष केले. नियमाप्रमाणे रस्त्याचे काम करणे अपेक्षित असताना चुकीच्या मार्गाने काम उरकण्यात आलेले आहे. या कामाची देखभाल व नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सक्षम अधिकारी उपस्थित राहिले नाहीत .यामध्ये बरेच काही गोष्टी उघडतील झालेल्या आहेत.
ज्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. अशाच ठिकाणी रस्त्याची लांबी रुंदी कमी करून इतर ठिकाणी रस्ता करण्याचा घाट घातला. सदरच्या गावामध्ये एसटी सेवा सुरू झाली असून एसटी चालकांना एसटी वळवण्यासाठी अडचणी येत आहेत. सदरच्या कामाला मिळालेली मंजुरी व नकाशे तपासूनच या कामाचे बिल अदा करावे .अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या कामाबाबत शासकीय पातळीवर न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी सभापती तानाजीराव शिर्के यांनी संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधी यांना लेखी दिला आहे. रस्ते लगत ची जागा खाजगी मालकीची असून दहा बाय दहा चे काम थांबवण्यात आले आहे . कोणताही ठोस पुरावा न सादर काम वळविण्यात आले आहे.असे ल सांगण्यात आले आहे. त्याबाबतीत वादावादी वर पडदा टाकून नागरिकांची सुविधा व्हावी म्हणून ज्यादा काम करण्यात आल्याची माहिती ठेकेदारांनी दिली आहे.म्हसवे गाव ते फाटा असा दोन किलोमीटर अंतरावर हा रस्ता खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून झालेला आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत लक्ष घालून सम्यक मार्ग काढण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

छाया म्हसवे ता.जावली या ठिकाणी अतिक्रमण झालेला भाग बाजूला करून इतर ठिकाणाहून रस्त्याचे काम झाल्याची तक्रार करण्यात आली आहे (छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button