वाई:- किसन वीर महाविद्यालयात सायबर सिक्युरिटी वर कार्यशाळा संपन्न.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि. 04 किसन वीर महाविद्यालयात सायबर सिक्युरिटी वर कार्यशाळा संपन्न.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील बी.सी.ए. विभागामार्फत “सायबर सिक्युरिटी ओव्हरव्यू अॅंड करिअर अॅापॅार्च्युनिटीज” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेसाठी बीजभाषक म्हणून अमेरिकेतील एटीएनटी कंपनीचे डिजिटल अनॅलिटीक्स विभागाचे संचालक अजित गवळी व साधन व्यक्ती म्हणून अमेरिकेतील नासा या संस्थेला अवकाश संशोधनासाठी सहयोग करणाऱ्या ब्ल्यू ओरिजीन या कंपनीत सायबर सेक्युरिटी मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या सौ. शुभांगी पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंतराव चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, बी.सी.ए. चे समन्वयक प्रा (डॉ.) सुनील सावंत, उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कांबळे, प्रा. (डॉ.) विनोद वीर, डॉ. संग्राम थोरात यांची उपस्थिती होती.
आपल्या बीजभाषणात अजित गवळी यांनी सायबर क्षेत्रात युद्धजन्य परिस्थिती असून हॅकर्स महत्वाची माहिती चोरण्यासाठी हल्ले करतात तर सायबर सुरक्षा तज्ज्ञ माहिती संरक्षित करण्यासाठी लढत असतात असे प्रतिपादन केले.
सौ. शुभांगी पाटील म्हणाल्या, “सध्याच्या डिजिटल युगात अॅानलाइन माहितीच्या सुरक्षिततेसाठी सायबर सेक्युरिटीची गरज आहे.” सायबर गुन्हे या विषयी त्यांनी माहिती दिली. एन्क्रिप्शनचा फायदा सायबर सेक्युरिटी साठी कसा होतो ते त्यांनी सांगितलं. यानंतर सायबर सेक्युरिटी मध्ये करिअर करण्यासाठी मार्ग कोणते आहेत हेही त्यांनी विध्यार्थ्यांना सांगितलं. करिअर करताना ध्येय निश्चिती, संयम, कठोर परिश्रम यांची आवश्यकता असते असे त्या म्हणाल्या.
यावेळी श्री. गवळी व सौ. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सायबर सेक्युरिटी व सायबर क्राईम विषयी असलेल्या शंकांचे निरसन केले.
संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. चौधरी म्हणाले, “तुम्ही नवीन तंत्रज्ञान अवगत करणे आणि त्याविषयी माहिती करून घेणे हे तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयोगी आहे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, “सायबर सेक्युरिटी चा अर्थ तुम्ही डिजिटल विश्वात वावरताना स्वतः तुमची जबाबदारी समजून घेणे गरजेचे आहे. तसेच सुरक्षिततेच्या नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे.”
प्रास्ताविक प्रो. (डॉ.) सुनील सावंत यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी बी.सी.ए. विभागामाध्ये घेतले जाणारे उपक्रम व बी.सी.ए. च्या विदयार्थ्यांनी विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नोंदवलेला सहभाग व मिळवलेली बक्षिसे यांचा खास उल्लेख केला.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय बी.सी.ए. विभाग प्रमुख सौ. अर्चना कदम यांनी करून दिला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. श्रद्धा चौधरी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सौ. पौर्णिमा गायकवाड यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी बी.सी.ए. विभागातील शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेस महाविद्यालयातील शिक्षक, बी.सी.ए.चे विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.