खटाव:-वडूजचे दस्तूर खुर्द नायब तहसिलदार उतरले माणुसकीसाठी रस्त्यावर.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
दस्तूर खुर्द नायब तहसिलदार उतरले माणुसकीसाठी रस्त्यावर.
वडूज दि: खटाव तालुक्यातील
वडूज ते दहिवडी रस्त्यावर प्रवास करणाना अचानक पाऊस कोसळला. त्याचबरोबर रस्त्यात बाभळीचे झाड कोलमडून पडले. त्यामुळे रस्त्यात वाहतूक समस्या निर्माण झाली. कोणीतरी मदतीला यावे याची वाट न पाहता तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे समजून वाई प्रांत कार्यालयातील नायब तहसिलदार हेमंत दीक्षित व त्यांचे नातेवाईक तथा छायाचित्रकार सूरज पोतदार यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने ””’ साथी हाथ बढाना ”””’ असे समजून वाहतूक समस्या दूर केली. त्यामुळे अडचणीत आलेल्या वाहन चालकांनी सर्वांना धन्यवाद दिले.
गुरुवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता वडूज- दहिवडी रस्त्यावर एका शोरूमच्या पुढील बाजूस भाबळीचे झाड कोसळून पडल्याची निदर्शनास आल्यानंतर सर्व जण मदतीची अपेक्षा करीत होते.
यावेळी सर्व वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती. त्या रस्त्यावरून प्रवास करणारे वाई प्रांत कार्यालयातील हेमंत दीक्षित व सुरज पोतदार यांच्या अचानक लक्षात आले की, वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे. त्यामुळे स्वतः श्री दीक्षित हे गाडीतून उतरले व झाड पडलेले बाजूला करण्यास गेले. त्यामुळे नंतर मागून एक दोन प्रवासी उतरून त्यांना मदत करण्यास गेले. सदरचे झाड स्वतः नायब तहसिलदार हेमंत दीक्षित यांनी बाजूला केले व वाहतूक सुरळीत झाली. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सूचनेनुसार तातडीने उपाय योजना केल्यास लोकांना वेळेत मदत मिळते. त्याचाच भाग यावेळी पहाण्यास मिळाला. विधायक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने महसूल विभागातील अधिकारी व त्यांचे सहकारी मित्र यांनी नागरिकांचे ही कर्तव्य पार पाडले. त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुक्यातील अध्यक्ष कुणाल गडांकुश, ए गटाचे सागर भिलारे, मनसे चे सूरज लोहार, कुरोली माजी सरपंच राजू फडतरे, परेश जाधव, धनाजी चव्हाण, अनिल माळी आदी मान्यवरांनी श्री. दीक्षित व पोतदार यांचे कौतुक केले.
_________________________________
फोटो – वडूज- दहिवडी रस्त्यावर वाहतूक समस्या दूर करताना मान्यवर (छाया- सूरज पोतदार)