नांदुर्खी बु.गावात रात्री घराची बाहेरून कडी लावून नितीन चौधरी यांच्या शेळ्यांची चोरी…
पत्रकार प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर:9767653309

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर
नांदुर्खी बु.गावात रात्री बारा नंतर नितीन शिवाजी पा.चौधरी यांच्या घरी गोठ्यात असलेल्या अंदाजे किंमत रु.वीस हजार रु.किंमतीच्या दोन शेळ्या चोरल्याची घटना दि.५-६-२०२३रोजी घडली आहे.शेळ्या चोरते वेळी चोरांनी नितीन चौधरी यांच्या घराच्या बाहेरून कड्या लावून घेतल्या व बाहेर लावलेली असलेली मोटारसायकलींच्या प्लगचीही वायर काढून शेळ्या घेऊन पसार् झाले.या घटनेची तक्रार नितीन चौधरी यांनी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली.यावेळी पोलीस अंमलदार यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन घटना स्थळाची पाहनी केली.व लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याचे पोलीस अंमलदार यांनी सांगितले आहे…या घटने नंतर लोक पोलीस स्टेशनने रात्रीची ग्रामीण भागात गस्त वाढवून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी पत्रकार वसंतराव पा.काळे यांच्याशी बोलताना केली आहे…