आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-किसन वीर मध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न.

पत्रकार वैष्णवी शिंदे:-9146802009

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार वैष्णवी शिंदे

किसन वीर मध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न.
राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम
वाई, दि. ०६/०६/२०२३ – ०६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हा दिवस सर्वत्र शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. वाईतील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनेही शिवस्वराज्य दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य व एन.एस.एस.चे सल्लागार प्रो. (डॉ.) सुनील सावंत, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रो. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, मराठी विभागप्रमुख व एन.एस.एस चे सल्लागार डॉ. चंद्रकांत कांबळे, कार्यक्रम अधिकारी अनुक्रमे डॉ. अंबादास सकट, डॉ. संग्राम थोरात व कनिष्ठ लिपीक जितेंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.
शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तत्कालीन समाजातील अठरापगड जातीतील लोकांनी याकामी शिवरायांना साथ दिली. त्यामुळेच साडेतीनशे वर्षानंतरही या लोकराजाचे नाव आजच्या २१ व्या शतकातही जन-माणसाच्या हृदयावर कोरलेले आहे. शिवरायांचे नाव उच्चारताच आजही अबालवृद्धांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. त्यांच्या शौर्याचा जीवनपट ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. आमची जनता शिक्षण संस्थाही शिवरायांच्या ध्येयधोरणानुसार गेली ६० वर्षे कार्यरत आहे.
सदर दिनाचे औचित्य म्हणून शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे पोस्टर्स तयार करण्यात आले होते. या पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुयश पाटणे व संकेत दळवी यांना विभागून, द्वितीय क्रमांक अमृता कदम, तृतीय क्रमांक रोहित मांढरे यांनी प्राप्त केला. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले. प्रो. डॉ. सुनील सावंत व डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. यात आदित्य लहाने, दूर्वा हेळकर, रसिका व्याहळीकर, श्रेया दाभाडे, शामली कोरी, श्रावणी बगाडे, प्रज्ज्वल गायकवाड व सृष्टी गाडे यांनीही पोस्टर्स सादर केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुयश पाटणे या स्वयंसेवकाने शिवरायांचा पोवाडा सादर केला. डॉ. अंबादास सकट यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संग्राम थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितेंद्र चव्हाण यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व एन.एस.एस.चे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button