आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

पनवेल:-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल इंडिका टूल्स डॉट कॉम वेबसाईट वरती मान हानिकारक मजकूर लिणाऱ्या ईसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी-सौ रूपालीताई ताई शिंदे सामाजिक कार्यकर्त्या.

पत्रकार आशितोष चव्हाण:-7447520147

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार आशितोष चव्हाण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल इंडिका टूल्स डॉट कॉम वेबसाईट वरती मान हानिकारक मजकूर लिणाऱ्या ईसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी-सौ रूपालीताई ताई शिंदे सामाजिक कार्यकर्त्या.

पनवेल रायगड नवी मुंबई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल इंडिका टूल्स डॉट कॉम या वेबसाईट वरती मान हानिकारक मजकूर लिणाऱ्या ईसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सौ रूपालीताई ताई शिंदे सामाजिक कार्यकर्त्या  ‌पनवेल मध्ये कार्यरत असलेल्या क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष सौ. रुपालीताई शिंदे यांनी दि. ३१ मे २०२३ रोजी मा. पोलीस आयुक्त परिमंडळ २, पनवेल यांना आई सावित्रीमाई फुले यांच्याबाबत खोडसाळ खोटी व मानहानीकारक मजकुर व माहिती इंटरनेट वेबसाईट वर प्रसिद केल्याकारणाने “इंडिक टेल्स’ (Indic Tales.com) या वेबसाईट विरोधात तथा बदनामीकारक माहिती लिहणाऱ्या इसमा विरूध्द कठोर कारवाई करणेबाबतचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले कि, आई सावित्रीमाई फुले यांनी भारतीय स्त्री शिक्षण व बहुजन समाजासाठी आपले आयुष्य अर्पण केलेले आहे. समाजात न्याय, शांती व बंधुत्व तथा समानतेची शिक्षा भारतीय समाजास दिलेली आहे. अशी सत्यपरिस्थिती असताना “इंडिक टेल्स’ ‘ (Indic Tales.com) या वेबसाईट माध्यमाने लेख प्रसिध्द करून आमच्या आईची बदनामीकारक व अपमानकारक भाषेचा वापर करून अत्यंत खालच्या दर्जाची बदनामी केलेली आहे. सदरहुचा प्रकार हा अत्यंत संतापजनक व घाणेरडा असुन सदरहु बदनामीमुळे सावित्रीबाई फुले यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम महिला वर्गांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. सदरहू पोर्टलवर बहुजन समाजातील मातेची अशी अवहेलना व बदनामी बाबतचे लेख लिहणाऱ्या वेबसाईट वर व त्याच्या लेखकावर कायदेशीर कारवाई होणे कायदयाने गरजेचे आहे. तरी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या वतीने नम्र विनंती कि साहेबांनी सदरहु घटनेची दखल घेवुन महामानवाची बदनामी करणाऱ्या वेबसाईटवर बंदी आणुन आरोपी विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले. पनवेल रायगड जिल्ह्यातील सर्व ओबीसी महासंघ महात्मा फुले समता परिषद सावता परिषद बहुजन वर्ग सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था रायगड वासी यांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button