पुसेसावळी येथे महसूल सेवा पंधरवडा अभियान सुरू.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
पुसेसावळी येथे महसूल सेवा पंधरवडा अभियान सुरू.

देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या “महसूल सेवा पंधरवाडा” उपक्रमांतर्गत पुसेसावळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान माजी जिल्हा परिषद सदस्या मा. सुनिताताई धैर्यशील कदम यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
या अभियानाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधताना जनतेच्या अडचणी व त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी त्वरित मार्गी लागतील अशी कामे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न केला. पुसेसावळीकरांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असणार आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी सौ. उज्वला गाडेकर मॅडम, नायब तहसीलदार मा. सुनील चव्हाण साहेब, पुसेसावळी मंडल अधिकारी मा. प्रवीण घोरपडे, मंडल कृषी अधिकारी मा.अधिक चव्हाण, सरपंच सौ. सुनंदा माळी, माजी उपसरपंच मा.अकबर बागवान, मा. दत्तात्रय रुद्रके, मा. संभाजीराव कदम, मा. धनंजय पाटील, मा. रायसिंग माळवे, तलाठी मा.संदीप काटकर, मा.उज्वला खराडे, मा.ऐश्वर्या कांबळे व पुसेसावळी मंडलातील सर्व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.




