ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता तालुक्यातील कणकुरी ग्रामपंचायतचा मागील सत्ताधाऱ्यांचा घरकुल आवास येजनेत मोठा आर्थिक घोटाळा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

RPS STAR NEWS

शिर्डी प्रतिनिधी – राहाता तालुक्यातील कणकुरी ग्रामपंचायतचा मागील सत्ताधाऱ्यांचा घरकुल आवास येजनेत मोठा आर्थिक घोटाळा.

 

शिर्डी प्रतिनिधी – राहाता तालुक्यातील कणकुरी ग्रामपंचायत मार्फत मागील सत्ताधाऱ्यांच्या काळातील गोरगरीब लोकांसाठी हक्काचा निवारा म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना बांधण्याचे काम झाले होते.यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आता समोर येत आहे.बांधकाम निकृष्ठ दर्जाचे,पत्र्याची क्वालिटी,त्यासाठी वापरलेले लोखंडी पाईप सर्वच साहित्य हे अत्यंत हलके वापरल्यामुळे थोड्याशा वादळामुळे सुमारे दहा खोल्यांचे पत्रे उडून डांबरी रस्त्यावर पडले.यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.लोखंडी पाईप हे खूप हलके वापरण्यात आले आहेत.पत्र्याची परिस्थितीही अगदी तशीची.भिंतीची बांधकाम क्वालिटीही अत्यंत खराब आहे.भिंत अक्षरशः हाताने हलतात.गोरगरीब जनतेला या निवार्याच्या चाव्या हातात मिळण्याच्या अगोदरच हा घोटाळा समोर आला आहे.गोरगरीब लोकांना जर अशा प्रकारे प्रशासन खोल्या बांधून गोरगरीब जनतेची फसवणूक करत असेल तर लोकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर.कणकुरी ग्रामस्थांची आता मागणी होत आहे की या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी होऊन लवकरात लवकर योग्य कारवाई सर्व दोषी व्यक्तींवर करण्यात यावी.व सर्व रक्कम दोषींकडून वसुल करून पुन्हा सर्व बांधकाम पाडून नवीन भक्कम घरकुल खोल्या बांधून गोरगरीब जनतेला द्याव्यात.अन्यथा घरकुल लाभार्थी कोणत्याही क्षणी आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत..अशी माहिती मिळत आहे.त्याठिकाणी गोरगरीब जनतेसाठी विस खोल्यांचे काम पूर्ण झाले आहे.म्हणजेच सत्तावीस लाख एकसष्ट हजार आठशे रुपये इतकी सरकारी रक्कम या कामासाठी खर्च झाली आहे.आणी इतकी मोठी रक्कम खर्च करून जर अशी अवस्था असेल तर गोरगरीब जनतेने करायचे तरी काय.असा प्रश्न नागरिक प्रशासनास करत आहेत.यात जे जे दोषी आढळतील त्या सर्वांवर लगेच चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात यावे.व गोरगरीब जनतेला न्याय द्यावा अशी मागणी कणकुरी व आसपासच्या परिसरातील नागरिक खाजगीत करत आहेत.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button