आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-बारावी बोर्ड परीक्षेत किसन वीर महाविद्यालयाचे उज्ज्वल यश.

महिला पत्रकार वैष्णवी शिंदे:-9146802009

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

महिला पत्रकार वैष्णवी शिंदे

बारावी बोर्ड परीक्षेत किसन वीर महाविद्यालयाचे उज्ज्वल यश.
वाई – बारावी बोर्ड परीक्षेत जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९२.६५ टक्के लागला आहे. यामध्ये विशेष अभिमानाची बाब म्हणजे २४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत व १४० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेचा निकाल ९७.६८ टक्के लागला असून यामध्ये कु. रोशनी धनंजय जायगुडे या विद्यार्थीनीने ८७.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. सानिका जयवंत शिंदे या विद्यार्थीनीने ८५.५० टक्के गुण मिळवून द्वितीय व कु. अनघा रामचंद्र शेळके या विद्यार्थीनीने ८२.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल ९४.२५ टक्के लागला असून यामध्ये कु. नेहा संतोष चौधरी या विद्यार्थीनीने ८९.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. प्रेरणा गोरखनाथ देवकर या विद्यार्थीनीने ८३.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कु. अनुष्का निरंजन यादव या विद्यार्थीनीने ८१.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
कला शाखेचा निकाल ७६.८७ टक्के लागला असून यामध्ये संकेत संपत कांबळे या विद्यार्थ्याने ८३.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, आशिष अनिल मराठे या विद्यार्थ्याने ८२.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कु. साक्षी शिवाजी भोसले हिने ८०.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकररावजी गाढवे, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनील सावंत, प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, व प्रा. डॉ. विनोद वीर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र शिंदे, पर्यवेक्षक प्रा. विवेक सुपेकर, कार्यालय प्रमुख रघुनाथ शेलार, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button