वाई:-खंडाळ्यात कृषी पदवी कॉलेजसह ३१ कोटींच्या रस्ते दुरुस्ती कामांना मंजुरी.
महिला पत्रकार वैष्णवी शिंदे:-9146802009

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
महिला पत्रकार वैष्णवी शिंदे
खंडाळ्यात कृषी पदवी कॉलेजसह
३१ कोटींच्या रस्ते दुरुस्ती कामांना मंजुरी.
मदन भोसले यांच्याकडून माहिती
वाई : कृषी पदवीसाठी परिसरातील विद्यार्थ्यांना दूरवर जावे लागू नये यासाठी खंडाळा येथे कृषी पदवी अभ्यासक्र, वाई ते महाबळेश्वर वीज वाहक तारा भूमिगत करणे आदी कामांसोबत वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती माजी आमदार मदन भोसले यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये खंडाळा येथे कृषी पदविकेपर्यंत शिक्षण घेण्याची सोय आहे. त्याच शिक्षण संकुलात कृषी पदवी अभ्यासक्रमास मान्यता मिळावी अशी मागणी करण्यात आली. त्यास त्यांनी मान्यता दिली आहे. त्याचसोबत महाबळेश्वर आणि पाचगणी ही पर्यटन स्थळे डोंगरी भागात वसलेली असून सदर ठिकाणचा विद्युत पुरवठा वाईच्या उपकेंद्रातून होतो. सदर विजपुरवठा पावसाळ्यात खांब पडून वारंवार खंडीत होतो. त्यामुळे वाई ते महाबळेश्वर वीज वाहक तारा भूमिगत करण्याची मागणी केली असून त्यास तत्वत: मान्यता मिळाली आहे.
वाई येथील वीज उपविभागीय केंद्रावर ९० हजारहून अधिक ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो. हा भार कमी होण्यासाठी भुईंज येथे आणखी वीज उपविभागीय केंद्र उभारण्याची मागणी केली असून त्यास मान्यता मिळाली आहे.
हिंदकेसरी, अर्जुन पुरस्कार विजेत्यांसह विविध क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी या मागणीही दखल घेवून त्याबाबत संबंधितांना त्यांनी सूचना दिल्या आहेत.
याचसोबत विशेष रस्ते दुरुस्ती योजनेतून सुमारे ३१ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मान्यता मिळाली असून त्यामध्ये पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, वाठार, भाडळे, बुध, राजापूर, दहिवडी रस्ता, किसन वीर महाविद्यालय ते पाचवड फाटा रस्ता, पारगाव यवत सासवड कापुरहोळ भोर मांढरदेव वाई सुरूर रस्ता, पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, वाठार, भाडळे, बुध, राजापूर, दहिवडी रस्ता, खानापूर ते जोशी विहिर ते शिरगांव रस्ता, भुईंज शिवथर पाडळी जळगांव रस्ता, जांभळी वाशिवली वासोळे आकोशी वयगांव बलकवडी फाटा ऊळंब जार धनगरवाडा कात्रटवस्ती रस्ता, जाधववस्ती राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ते बोपेगाव पांडे ओझर्डे सोनेश्वर, कडेगाव व्याजवाडी वाघजाईवाडी म्हातेकरवाडी बावधन रस्ता, बावधन फाटा ते घरटाणा रस्ता, ओझर्डे, मालदरा, अनवडी, शिरगांव, भोसलेवस्ती, देगाव, किकली, निकमवाडी, जांब, चांदवडी रस्ता, पाचगणी, कुडाळ, उडतारे, खडकी, चांदवडी, जांब, किकली, म्हापारवाडी, लगडवाडी, किकली ते लगडवाडी रस्ता, ओहळी, पाकोरेवस्ती, रायरेश्वर, घेराकेंजळ, खावली रस्ता, वाई, परखंदी, मुंगसेवाडी, चांदक, वेळे ,सोळशी रस्ता, आदी 31 कोटींच्या कामांचा समावेश आहे.
या सर्व कामांना मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले असून ही कामे लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मदन भोसले यांनी या पत्रकात व्यक्त केला आहे.