राहता:- नांदूर्खी बु.गावात एका विचित्र अपघातात दोन जण गंभीर जखमी.
पत्रकार वसंत काळे अहमदनगर:-9767653309

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर
राहता – मिळालेल्या माहितीनुसार राहाता तलुक्यातील नांदूर्खी बु.गावात कृष्ण मंदिर जवळ पाटावर असलेल्या पुला जवळ एक विचित्र अपघात दि.२५-५-२०२३ रोजी दुपारच्या सुमारास घडला.जोरदार वेगाने असलेली कार,एक टू व्हीलर व एक स्कुटी या तीन वाहनांचा एकाच वेळी समोरासमोर अपघात होऊन चार चाकी वाहनाची टू व्हीलरला धडक बसून नंतर चार चाकी कार रत्याच्या बाजूला असलेल्या उभ्या असलेल्या ट्रॉलीवर जाऊन जोरदार धडकली.यात दोन जणांना गंभीर मार लागला आहे अशी माहिती मिळाली आहे.व पुढील उपचारासाठी त्यांना हास्पिटल मध्ये नेण्यात आले आहे.तरी अशा होणाऱ्या घटना टाळण्यासाठी या रोडला स्पीड ब्रेकर टाकण्याची वेळोवेळी ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे.तरी लवकरात लवकर भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी PDW ने याची गंभीर दखल घेऊन योग्य पावले उचलली नाहीत तर ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत..