ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-वडूज नगरीत औषधाच्या दुकानासमोरच रस्त्यावर पडलेला खड्डा मुजविण्याची मागणी.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

 पत्रकार अजित जगताप सातारा

वडूज नगरीत औषधाच्या दुकानासमोरच रस्त्यावर पडलेला खड्डा मुजविण्याची मागणी.

वडूज दि: सध्या विकास कामांबाबत सोशल मीडियावर कोटी रुपयांच्या निधी आणल्याचे उड्डाण होत आहे. तर दुसऱ्या बाजूला रस्त्या तील खड्यामुळे सहन ही करता येत नाही. सांगता ही येत नाही. अशी स्थिती आहे. तरी ही समर्थकांमध्ये राजकीय चढाओढ लागली आहे. तरी खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये सध्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना स्वतःची व वाहनाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी निधी खर्च करावा लागत आहे. विशेष म्हणजे औषधाच्या दुकानात शेजारीच खड्डा पडला असून लोकांना त्वरित औषध उपचार व्हावा यासाठी हा खड्डा दुर्लक्षित ठेवला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील वडूज ते कराड या रस्त्यावर खड्डा कशाला म्हणावा? एवढ्या लांबी रुंदीचा रस्त्यातच खड्डा पडलेला आहे. दररोज शेकडो वाहने या मार्गावरून मार्गक्रमण करतात. सदरच्या रस्त्याला बगल देऊनच ये जा करत असताना अनेकांची वाहने धडकू लागलेली आहेत. वाहने धडकले तरी चालेल? जखमी झालो तरी चालेल? पण, आंदोलन करणार नाही. लोकांना वेठीस धरणार नाही. अशी परिस्थिती वडूज नगरीमध्ये दिसून येत आहे. हुतात्म्याची नगरी असा प्रत्येक वेळी उल्लेख होत असल्याने या हुतात्मा नगरीतला भेट देणाऱ्यांना अशा हुतात्म्यांचे मनापासून कौतुक वाटत आहे. त्यांच्यामुळेच खरं म्हणजे स्वातंत्र्य मिळाले हे त्रिवार सत्य आहे. त्या काळी जर आजच्या सारखी पिढी असती तर ब्रिटिशांना जाऊनच दिलेले नसते. असा एक मतप्रवाह निर्माण झालेला आहे.
विषय गैरसोय किंवा रस्त्यावरील खड्ड्याचा नसून एक मानसिकता जी तयार झालेली आहे. त्याबाबत चीड निर्माण होत नाही. उद्या रस्त्यावर त्या ठिकाणी भविष्यात विहीर निर्माण झाली तर त्या विहिरीतील पाणी काढण्यासाठी लोक रांगेत उभे राहतील. असे विनोदाने बोलले जावू लागले आहे. वास्तविक या खड्ड्यामुळे होणारा त्रास अनेकांना वेदनादायी असला तरी या खड्ड्याचा बंदोबस्त करावा या खड्ड्यावर किमान स्वखर्चाने तरी मुरूम टाकावा. अशी लोक भावना मोठे व्यापारी, सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे नेते व इतर कोणाची ही झालेली नाही. विकास कामांबाबत कोटी रुपयांचा निधी आल्याचे बोलले जात आहे. यासाठी सोशल मीडियाचा सरस वापर होतो. पण, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकास कामांसाठी निर्माण झालेल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नेते हा खड्डा भरण्यासाठी पुढाकार घेत नाही. प्रत्येक गोष्ट ही सरकारनेच करावी असं काही विधी लिखित नाही.
सदरचा खड्डा मुजवून पावसाळ्यापूर्वी प्रवाश्यांना सुखद धक्का दयावा. असे आठवा वेतन आयोगाची वाट पहाण्याऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाला ही वाटू नये. याचे नवल वाटत आहे. दरम्यान, सदरच्या रस्त्यावरील खड्डे मूजवून गैरसोय दूर करावी अशी मागणी उन्हाळ्याच्या सुट्टी साठी गावी आलेल्या अनेक मान्यवरांनी केली आहे.
_________________________________________
फोटो_वडूज- कराड रस्त्यावरील एका औषध दुकाना समोरील पडलेला मोठा खड्डा (छाया – सूरज पोतदार, वडूज)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button