ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-प्रगल्भ जाणिवेचा ज्येष्ठ पत्रकार बाबुराव शिंदे यांना आनंदी जीवनासाठी शुभेच्छा………………….

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

“जागर वृत्त”, सातारा.
👇👇👇👇👇👇
प्रगल्भ जाणिवेचा ज्येष्ठ पत्रकार
बाबुराव शिंदे यांना आनंदी जीवनासाठी शुभेच्छा………………….
एक तरल संवेदनेचा पत्रकार कालच्या पिढीतील सम्यक पत्रकारिता करणारा एक संपादक साहित्य संस्कृती राजकारण या तिन्ही क्षेत्रात आपलं जनसंपर्क ठेवून सतत विचार विश्वात रमणारा वैचारिक चर्चांना महत्त्व देणारा असा हा सातारा जिल्ह्यातील पत्रकार कार्यकर्ता म्हणजे बाबुराव शिंदे होय सांस्कृतिक जीवनामध्ये अनेकांशी सतत संपर्क ठेवून सांस्कृतिक कार्यक्रमात श्रोता वक्ता संयोजक या भूमिका निभावणारा बाबुराव शिंदे हा पत्रकार मित्र होय

जावली तालुक्यातील आखाडे गावचा हा युवक किसनवीर महाविद्यालयातील साहित्याचे संस्कार घेऊन वाईच्या सांस्कृतिक नगरीत सतत विद्यार्थी कालावधीत व्यस्त असणारा साहित्याची जाण असणारा पत्रकार सामाजिक चळवळी राजकीय पक्ष यांच्यामधील गतिशीलता आणि विकास यासाठी अस्वस्थ असणारा हा पत्रकार राजकीय नेत्यांच्या बरोबर सतत संवादात राहणार हा पत्रकार स्थानिक व राज्य पातळीवर मान्यवरशी संपर्क ठेवून अनोपचारिक मैत्री जपणारा सांस्कृतिक कार्यकर्ता हा साहित्य कार्यकर्ता आहे व्यक्तिगत जीवनात उद्या ती करण नाकारणारा मात्र स्नेहाचे संबंध जखमेमध्ये काळजी घेणार आहे सर्वांच्या भूमिका ऐकणारा आपले मतभेद जाहीरपणे व्यक्त करणारा आणि वेगळ्या वाटा चालणारा हा तरल संवेदनेचा मित्र आहे

राजकारण्यांचे संबंध ही अवघड गोष्ट असते त्यांची खप्पा मर्जी सतत मिळवणे ही अवघड गोष्ट असते पण या बाबींची फिकर न करता तात्काळ मतभेदानंतर स्वतंत्र एकला चलो या मार्गाने सातारा जिल्ह्याच्या साहित्य संस्कृती राजकारण या सर्व क्षेत्रात सर्वत्र संचार करणारा हा एक प्रागतिक विचाराचा मित्र आहे
बाबुराव शिंदे यांनी अनेकांना निष्ठेची मैत्री देऊ केली लाभाचा विचार केला नाही व्यक्तिगत हितसंबंध कारणासाठी ठेवले आपल्या जीवनातील स्वतंत्रता जपली आणि सतत समाजाभिसरणातील नवे नाविन्य शोधत हा मित्र पुढे चालत राहिला आहे कटुता गैरसमज हे टाळून विसरून स्वतंत्रता आणि अलिप्तता प्रसंगी दीर्घकालचीनिष्ठा हे सर्व गुण बाबुराव शिंदे या व्यक्तिमत्त्वात आहेत स्वाभिमान अस्मिता ही व्यक्तिगत जीवनातील मूल्य जपण्यासाठी पडेल ती किंमत मोजणारा आणि हित संबंधांच्या विपरीत परिणामाचा विचार न करणारा भूतकाळ विसरणारा मात्र व्यक्तिगत नात्याचे संबंध हीच वर्तमानातील श्रेष्ठ गोष्ट आहे असे मानून सहवासाचा आनंद देणारा बाबुराव शिंदे हा पत्रकार कार्यकर्ता साहित्याचा सूक्ष्मवाचक हा अनेकांना सतत आनंद देतो सहवास देतो मात्र स्वतःच्या जीवनाला स्वायत्तपणे पुढे घेऊन जात असलेला आढळून येतो अशा या पुस्तक प्रेमी साहित्य प्रेमी सांस्कृतिक प्रेमी मित्राला सातारा जिल्ह्याच्या राजकारण्यांनी ओळखले नाही अशी खंत वेदना वाटून राहते बाबुराव शिंदे हा प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा सृजनक्षमता असलेला संस्कृतिक जाणीव आणि आकलन असलेला राजकारणाचे दंभस्फोट माहीत असलेला हा जवळचा मोठा माणूस मोठा मित्र सर्वांना माहीत असलेला आहे अशा मित्राच्या निरोगी निरामय वाचन प्रेमी जीवनासाठी शुभेच्छा एक निरपेक्ष मित्र म्हणून देताना आत्यानंद होतो आहे बाबुराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हे सभ्यतेचे शब्द त्यांच्यासाठी आणि सर्वांसाठी खूप सुसंस्कृत माणुसकीचे दर्शन घडवणारे आणि बोध देणारे ठरतील त्याला कारण ठरलेल्या बाबुराव शिंदे या प्रगल्भ मित्राला पुन्हा पुन्हा अंतकरणपूर्वक शुभेच्छा.

आपला नम्र
शिवाजी राऊत
समकालीन पत्रकार 14 मे 2023
👆👆👆👆👆👆
जितेंद्र जगताप
जागर वृत्त, सातारा.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button