मावळ:-जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर भरदिवसा प्राणघातक हल्ला-उपचारा दरम्यान आवारेंचे निधन.
पत्रकार प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ
जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर भरदिवसा प्राणघातक हल्ला-
उपचार दरम्यान आवारेंचे निधन.
आज दि. १२ रोजी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यालयासमोर भरदिवसा प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात ते अत्यंत मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. उपचारादरम्यान सोमाटणे येथे खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते त्यावेळी अगोदाराच दबा धरून बसलेल्या सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने आणि बंदुकीने गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला. हल्ला करून ते हल्लेखोर काहीकाळ त्याच ठिकाणी थांबून होते. किशोर आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे येथे खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आवारेंच्या सामजिक कामामुळे गरीबांचा कैवारी कुटुंबप्रमुख आणि खराखुरा जनसेवक अशी ओळख निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोमाटणे टोल नाक्यावर आंदोलन करून तोल नाका हटविण्यासाठी आंदोलन केले होते. आणि आशा अनेक सामाजिक कामांमुळे तालुक्यात अनेकांच्या गळ्यातला ताईत झाले होते आणि त्यांच्या या आकस्मित निधनामुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा परसली आहे.
काही दिवसांपूर्वी शिरगाव येथे देखील अशाच पद्धतीने शिरगावचे सरपंच ( प्रवीण गोपाळे ) यांचा देखील देखील निर्घृण खून करण्यात आला होता. आशा पध्दतीने वारंवार होत असल्येल्या खुनी हल्ल्यांमुळे संपूर्ण मावळ तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने मावळ तालुका खरच असुरक्षित झालाय का असा सवाल सर्व मावळच्या जनतेकडून विचारला जात आहे.
आवारेंच्या मारेकर्यांना शोधण्यासाठी क्राईम ब्रांच ची चार पथके रवाना झाली असल्याचे सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनव यांनी सांगितले.