वैजापूर तालुक्यातील दहेगावचे भूमिपुत्र भारतीय नौदल हवालदार गणेश मदनलाल काकडे यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार.
पत्रकार प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे छत्रपती संभाजीनगर:9022552792

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे छत्रपती संभाजीनगर
छ.संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील दहेगाव या गावाचे भूमिपुत्र (ह.मु. नवनाथ नगर, एन-११) हवालदार गणेश मदनराव काकडे (बॉम्बे इंजीनियरिंग) भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावून ०१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. श्री गणेश काकडे यांनी आपले आयुष्यातील १९ वर्षे भारत मातेच्या रक्षणार्थ समर्पित करून सेवानिवृत्त झाले व आयुष्य भारत मातेच्या चरणी समर्पित करून परत आपल्या घरी आले आहे. या त्यांच्या समर्पणा प्रति कृतज्ञता म्हणून त्यांच्या दिनांक ०१ मे २०२३ रोजी आजी माजी सैनिक मित्र मंडळ, आप्तेष्टमंडळी व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने व पत्नी सौ. हर्षदा काकडे यांच्या विशेष कल्पना मधून नवनाथनगर येथे गौरव करण्यात आला.
आपल्या जन्मभूमीस परतले याप्रसंगी कुटुंबातील सर्वांनी तसेच माजी सैनिक मित्र मंडळ यांनी पुढाकार घेऊन त्यांची नवनाथनगर येथे मिरवणूक काढली. तसेच महिला भगिनींनी त्यांचे औक्षण करत जंगी स्वागत केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवर श्री गजानन सर्विसेस चे संचालक, समाज गौरव पुरस्कार प्राप्त व पुर्व भारतीय सैनिक श्री. गजानन पिंपळे यांनी तरुण पिढीला देश सेवे साठी प्रोत्साहित करून त्यांचे मनोबल वाढविले व पुढील वाटचालीस गावातील युवा पिढीस सैन्य दलात रुजू होण्यासाठी सदिच्छा दिल्या. या कार्यक्रमाला माजी सैनिकाची प्रत्येक यांनी सुद्धा प्रमुख्याची उपस्थिती दर्शविली. यामध्ये एन.एस.जी. कमांडो ज्ञानेश्वर कोल्ते, नामदेव सुसर, रमेश काळे निखील काळे, गणेश आग्रे, हरिदास शिंदे, दिगंबर भोजने, गावच्या सरपंच तथा नगरसेवक यांनी सुद्धा प्रत्येक गावातील, परिसरातील सैनिकाचा सन्मान करावा व गावातील युवा पिढीला प्रोत्साहित करावे. सैनिकाच्या सुखा-दुखात जय जवान जय किसान सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य सदैव आपल्या सोबत आहे. असे संबोधित करत त्यांनी सदिच्छा दिल्या. यावेळी हवालदार गणेश काकडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये ते म्हणाले एक सैनिक हा देशसेवा करून घरी येतो तेव्हा त्याचे केलेले कौतुक हा त्यांचा अभिमान वाढवतो. त्या पेक्षा मोठा आनंद नाही. सर्व आप्तेष्टमंडळी, मित्रगण परिवार व शुभचिंतक यांनी सर्वांनी मिळून केलेला हा गौरव सोहळा नक्कीच कायम स्वरूपी प्रोत्साहनकारक असेल. तसेच मी सुद्धा सेवा निवृत्ती नंतर समाजकार्यात अग्रेसर राहीन. हवालदार गणेश काकडे यांचे वडील श्री. मदनराव पुंजाबा काकडे व आई सौ. चंद्रकला काकडे यांनी सुद्धा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला सर्व बाबाजी भक्त परिवार, श्री.राजगौरव वानखेडे (माजी नगरसेवक), श्री. राहुल रोजतकर (नगरसेवक), श्री. कृष्णा बोरसे (PA भुमरे साहेब), ज्ञानोबा डायरेक्टर को- ऑपरेटीव बँकेचे संचालक श्री. चंदनशिवे सर, श्री रिठे आण्णा (शहर अध्यक्ष -जय बाबाजी भक्त परिवार), श्री. देवराव कोल्हे, सौ. मिनाक्षी कोल्हे, श्री अशोक काळे, सौ. वैशाली काळे, श्री. लखन तांबे, सौ. सारिका तांबे, श्री.अमोल कोतकर, सौ. अक्षता कोतकर, वीरमाता अनिता राहिंज, नवनाथ नगर मित्र मंडळ, प्रितमसिंग जाधव, सचिन गायकवाड, गजू जाधव, गणेश वाघ, प्रदीप कोल्हाडे, सागर पाले, श्री. तांगडे काका, प्रकाश थाले, सौरभ राहिंज (अकिरा फाडेशन) भारतीय विद्यालय मित्र मंडळ, अॅड. सुवर्णा मोहिते, सुष्मा वाघ तसेच सर्व परिसरातील महिला मंडळ व नागरिक उपस्थित होते.