आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त पाल परिसरातील वाहतुकीसंबंधीचे आदेश जारी.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त पाल परिसरातील वाहतुकीसंबंधीचे आदेश जारी.
सातारा दि:-11 : पाल ता. कराड येथे श्री खंडोबा देवाची यात्रा दि.२० ते दि.२८ जानेवारी २०२४ या कालावधीत भरणार आहे. या निमित्ताने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी २० ते २८ जानेवारी २०२४ कालावधीत पाल परिसरातील वातुकीत तात्पुरत्या बदलाचे आदेश जारी केले आहेत.
काशिळकडून तारळेकडे जाणारी सर्व वाहने निसराळे फाटा- इमरसन कंपनी सासपडे मार्गे तारळेकडे जातील. तारळेकडून काशिळ अथवा कराडकडे जाणारी वाहतुक ही तारळे येथून कोंजावडे फाटा- सासपडे मार्ग खोडद फाटा वरुन कराड कडे जातील. कराड तसेच पाल भागातून तारळे भागात जाण्याकरिता खोडद, ता.जि. सातारा येथील फाटयावरुन इमरसन कंपनी शेजारुन सासपडे मार्गे तारळेकडे जातील.
वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाईस पात्र राहतील.