फलटण:-बेकायदेशीर पणे झाड छाटले , पार्किंगही अडवले फलटण येथे बांधकाम व्यवसायिकाचा प्रताप.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
बेकायदेशीर पणे झाड छाटले , पार्किंगही अडवले
फलटण येथे बांधकाम व्यवसायिकाचा प्रताप.
फलटण :
शहरातील गजबजलेल्या गिरवी नाका येथील नवीनच बांधण्यात आलेल्या रहिवास व व्यवसायिक सदनिकेच्या बिल्डरने मनमानी पद्धतीने रस्त्यालगत असणाऱ्या सर्व दुकानासमोर पार्किंग जागेत नियमबाह्य रेलिग लावून मुख्य रस्त्यावरच गाड्या लावण्यास भाग पाडले आहे तसेच सदनिकेच्या समोरील एक झाड विना परवाना छाटले आहे नगर परिषदेने यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गिरवी नाका येथे नुकतीचनव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या बिल्डरने नगर परिषदेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळताच अनेक नियमबाह्य कामास सुरुवात केली असून सदनिकेच्या रस्त्यालगत असणाऱ्या सर्व दुकानासमोर बांधकाम नियमानुसार पार्किंग सोडण्यात आले असताना त्याठिकाणी दहा ते पंधरा फूट रस्त्याकडे लोखंडी रेलिंग लावून पार्किंग बंद केले आहे.
मुळात बांधकाम नियमानुसार कोणत्याही पार्किंग अथवा इतर सोयी सुविधा कडे रेखांकन मंजुरी नुसार व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नंतर बदल करता येत नाही असे असताना देखील सदर बिल्डरने विनापरवाना दुकानासमोरील पार्किंगला अडथळा निर्माण केला आहे.
सदरील लोखंडी रेलिंगमुळे या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मंजुरीनुसार असणाऱ्या पार्किंग जागेत गाडी न लावता रस्त्यावरच गाडी लावावे लागणार आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे. फलटणमध्ये या प्रकारे पार्किंग अडवण्याची नवीनच रीत सुरू झाली असून वेळीच अशा पार्किंग बंद करणाऱ्या बिल्डरवर नगरपरिषदेने कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होत असून सदर त्या ठिकाणी करण्यात आलेले लोखंडी रेलिंग तत्काळ काढून टाकण्याची कारवाई करत नगरपालिकेने सदनिकेला देण्यात आलेला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला रद्द करण्यात यावा.
पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र व राज्य शासन एकीकडे वृक्षलागवड मोहीम हाती घेत असताना दुसरीकडे याच सदनिकेच्या समोर असणारे एक भले मोठे झाड नगर परिषदे कडून झाडांचा विस्तार कमी करण्याची परवानीशिवाय छाटले आहे.त्यामुळे सदर बिल्डर विरोधात महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमण) अधिनियम 1964 चे कलम 3(1), 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी वृक्षप्रेमींची मागणी आहे नियमानुसार नगर परिषद प्रशासनाची वृक्ष तोडणे व छाटणे याकरीता परवानगीसाठी अर्ज करणे, त्यानंतर याबाबत नगर परिषद प्रशासनाकडून सर्वे व सर्व्हेअंती झाड धोकादायक असेल तर, अडथळा ठरत असलेले झाड तोडण्यास परवानगी मिळाली असती.परंतु कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता झाड छाटण्यात आले आहे.
नगर परिषदेच्या आर्थिक तरतुदीत वृक्षारोपण बाबत लाखो रुपयांची तरतूद करत असते परंतु शहरात कोठेही वृक्षारोपण होत नसल्याचे चित्र असून किमान जी झाडे आहेत ती झाडे जपण्याची आवश्कता असताना वृक्षतोडीकडे नगर परिषद डोळेझाक करत आहे. संबंधित झाड विनापरवाना बेकादेशीरपणे छाटून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी प्रकरणी सबंधित बिल्डर विरोधात नगर परिषदेने गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.
चौकट
मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना बांधकाम परवानगी व वृक्षतोड परवानगी याबाबत माहिती विचारली असता त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.त्यामुळे नगर परिषद प्रशासन अशा बेकायदेशर कामांना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र दिसत आहे.
फोटो
रेलिंग मुळे रस्त्यावर लावण्यात आलेली वाहने व तोडण्यात आलेले झाड.