पुसेसावळी :-21 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता वडी येथे मान्यवरांच्या उपस्थित पाणीपुरवठा सोहळा आयोजित.
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
21 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता वडी येथे मान्यवरांच्या उपस्थित पाणीपुरवठा सोहळा आयोजित.
मा.श्रीमंत छ.आ.शिवेंद्रराजे भोसले(बाबा),सातारा जिल्हा भाजपा अध्यक्ष मा.श्री.आ.जयकुमार गोरे (भाऊ ) आणि मा.श्री.धैर्यशील कदम (दादा ) यांचे विशेष प्रयत्नाने मा.श्री.विक्रमबाबा कदम यांच्या अथक परिश्रमातून सोडण्यात आलेल्या उरमोडी धरणातील पाण्याच्या वाटपा संदर्भात कराड-उत्तरचे नेते मा. धैर्यशीलदादा कदम,उरमोडी सिंचन विभाग वडूज शाखा अभियंता श्री.डी.बी.गुळीग आणि पुसेसावळी जि.प. गटाचे युवा नेतृत्व श्री. विक्रमबाबा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पाणी आवर्तनसंबधी पारगाव, येळीव, शिरसवडी, येरळवाडी, चोराडे, म्हासुर्णे,वांझोळी, भूषणगड, होळीचागाव येथील पाझर तलाव तसेच गावोगावचे ओढे,नाले भरून घेताना येणाऱ्या अडचणींबाबत बाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी गावोगावचे सरपंच,उपसरपंच,सोसायटी चेअरमन,संचालक, शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्या रविवार दि.21ऑगस्ट रोजी सकाळी 09.30 वाजता वडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पाणीपुजन सोहळा आयोजित केला असून सर्व शेतकरी ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.