कर्नाटक :- सौंदत्ती :- यल्लमा आईची संध्या आरती.
प्रतिनिधी:- स्वाती चव्हाण महाराष्ट्र :-8208717483

दि :-22/07/2022 कर्नाटक:- सौंदत्ती – यल्लमा आईची महती पूर्ण देशभरात पसरलेले आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या, जिल्ह्यातून तालुक्यातून भाविकांचे प्रचंड गर्दी सौंदत्ती या ठिकाणी होत असते. पोर्णिमा अमावस्या तसेच मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे वार मानले जातात. कर्नाटकातील सौंदत्ती या ठिकाणी स्थित यल्लमा देवीची महती जागृत देवी असे आहे. पोर्णिमा अमावस्याला तर यल्लमा आईच्या डोंगरावरती पाय ठेवायला सुद्धा भाविकांना जागा नसते. वेगवेगळ्या राज्यातून भाविक कार बैलगाडी मोटरसायकल ट्रॅक्टर अशा वेगवेगळ्या प्रवास साधनांचा उपयोग करून भाविक तिथे हजर होत असतात. नवसाला पावणारी. देवदासी आणि जोगती या लोकांचे हे या ठिकाणी मोठे प्रमाण आहे. चे देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात. यल्लमा आईसाठी भक्त जणांची ओढ येथे पहावयास मिळते.