श्रीरामपूर:-नाऊर मध्ये पत्नीचा गळा आवळून खुन.
प्रतिनिधी देविदास गायकवाड श्रीरामपूर:-9921435437

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717453
प्रतिनिधी देविदास गायकवाड श्रीरामपूर
नाऊर मध्ये पत्नीचा गळा आवळून खुन.
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे आपल्या पत्नीचा गळा आवळून खुन केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.आरोपी शांताराम सुखदेव देसाई रा. नाऊर यांचे व त्यांची पत्नी मयत निर्मला शांताराम देसाई यांचे किरकोळ कारणावरून रोजच भांडण व्हायची पण काल दुपारी २ च्या आसपास मात्र जिवाला हेलवणार कृत्य ऐकावयास मिळाले. पलंगाला हातपाय साखळीच्या साहयाने बांधले नंतर हाता पाया वर मार दिला. एवढे करुन हा नराधम थांबला नाही. नंतर त्या जखमावर मिठ चोळले आणी मग कपड्याच्या साहयाने गळा आवळाला. अतिशय निघृण पध्दतीने आपल्या पत्नीची हत्या करून आरोपी फरार न होता तेथेच बसुन रहिला. घटना स्थळी श्रीरामपूर विभागाचे डिवायएसपी मिटके साहेब यांनी तातडीने भेट देऊन पंचनामा केला व आरोपी शांताराम याला जेरबंद केले. पुढील तपास चौधरी साहेब करत आहे.