खटाव:-युवा नेते महेश घार्गे यांच्या वाढदिवसाचा केक आणला चक्क ‘ट्रॅक्टर’ने
प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अजित जगताप सातारा
युवा नेते महेश घार्गे यांच्या वाढदिवसाचा केक आणला चक्क ‘ट्रॅक्टर’ने
वडूज दि: कर्तबगार युवा पिढीमध्ये एक आदर्श निर्माण करणारे माजी आ. प्रभाकर घार्गे यांचे पुतणे व खटाव- माण अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड, पडळ ता. खटाव या खाजगी साखर कारखान्याचे संचालक महेश दादा घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवारांनी चक्क लहान ट्रॅक्टर मधून केक आणला. त्याची आता चांगलीच चर्चा होऊ लागलेली आहे .
विशेष बाब म्हणजे खटाव तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. वडूज, मायणी, पुसेगाव या ठिकाणी दि.३०एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रचारामध्ये गुंतलेले आहेत. सर्व पक्षातील प्रमुख नेते तसेच राष्ट्रीय समाज पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही उमेदवार दिल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. या प्रचाराच्या रणधुमाळी सर्वजण सहभागी झाले आहेत. युवा नेते महेश दादा घार्गे यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांचे जवळचे असलेली स्नेही श्री. गणेश खाडे यांनी खटाव विकास आघाडीचे चिन्ह असलेले ट्रॅक्टर म्हणजे खेळण्यातील ट्रॅक्टरवरून केक आणला आणि हा केक युवा नेते श्री घार्गे यांच्या हस्ते कापून त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
छोटखान्या कार्यक्रमाला श्री. गणेश खाडे, श्री. पंकज गडदे श्री वैभव पवार श्री. मुन्ना पटेल, पत्रकार अजित जगताप अशी मोजकेच हितचिंतक उपस्थित होते. आपल्या मित्रासाठी वेळात वेळ काढून युवा नेते श्री घार्गे व्यस्त कामातून वडूजला आले होते. त्यांनी आपल्या मित्राला आलिंगन देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी त्यांच्या मनाचा नम्रपणा तसेच मित्र प्रेम पाहून खऱ्या अर्थाने वाढदिवसाची भेट दिल्याचे दिसून आले. वाढदिवस साजरा होणे ही औपचारिक बाब आहे. परंतु, आपल्या मित्रासाठी त्याच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी युवा नेते हजर झाले. ही बाब श्री खाडे यांच्यासाठी कौतुकाची ठरली आहे .
—————————————————————-
फोटो –
छाया- वडूज येथील खटाव मान ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड कारखान्याच्या वडूज कार्यालयात केक कापताना युवा नेते महेश दादा घार्गे ( छाया- सुरज पोतदार ,वडूज)