आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिरगाव साई मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

पत्रकार कुंदा भोपी:-8689946799

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार कुंदा भोपी

शिरगाव साई मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

शिरगाव येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त घेतले साईचे दर्शन. .

शिरगाव येथील प्रतीशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साई बाबा मंदिराचा २१ वा वर्धापन दिन रविवार दिनांक 11 जून 2023 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त शिरगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे मुख्य विस्वस्थ माजी आमदार प्रकाश देवळे दिली.
वर्धापन दिनास चारिटी कमिशनर पुणे चे बुके साहेब. ठाण्याचे जंत्रे साहेब. आळंदी साई देवस्थान चे अध्यक्ष सुभाष निलगे. माजी नगरसेविका तथा अध्यक्षा आदर प्रतिष्ठान पुणे च्या सौ. साईदिशा माने. आदीमोठ्या संख्येने साई भक्तांची उपस्थिती लाभली होती.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सायंकाळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंदिरास भेट देवून साईबाबांची आरती केली. संस्थानाच्या वतीने केसरकर यांचा बाबांची मूर्ती शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. रविवार दि ११ रोजी सकाळी साई बाबांचा अभिषेक देवळे व सचिव सपना लालचंदानी यांच्या हस्ते करण्यात आला.
साई भक्तांना मंदिरातर्फे महाप्रसादाची मोफत सोय करण्यात आली होती. तसेच दिवसभर वेगवेगळ्या गायकांची भजन रुपी सेवा अर्पण केली. सायंकाळी आरती झाल्यानंतर मंदिराभोवती पालखी फेऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी फेऱ्यात शेकडो साई भक्तांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला.पालखीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती त्यामुळे मंदिराच्या सौदर्यात भर पडली होती. मंदिराचा गाभारा अत्यंत चित्ताकर्षक फुलांनी सजवला होता त्यामुळे मंदिराला एक वेगळ्या प्रकारचे सौदर्य प्राप्त झाले होते.
कार्यक्रमासाठी मंदिराच्या, विश्वस्त रवी जाधव,विभावरी जाधव मंदिराचे व्यवस्थापक अनिल देवकर, राकेश मुगळे, विजय लोखंडे, रमेश फरताडे, संतोष चव्हाण, मच्छिंद्र कापरे, लक्ष्मीकांत ठाकुरद्वारे, विष्णू कदम, गणेश कपिले,अर्जुन दहिभाते, सिद्धाजी माने, विजय हुंबे, साकेत कारंजकर, राधेशाम वारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button