खटाव:-मरडवाक गावच्या सरपंच पदी मा.श्री.संतोष पांडुरंग चव्हाण.
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9307293406

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मरडवाक गावच्या सरपंच पदी मा.श्री.संतोष पांडुरंग चव्हाण.
खटाव तालुक्यातील मरडवाक गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत, श्री भैरवनाथ श्री ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनलने सत्ता कायम ठेवत, घवघवीत यश संपादन केले आहे, सरपंच म्हणून सर्व सामान्य माणसाला बरोबर घेऊन, सामाजिक कार्यात अग्रेसर,असलेले संतोष पांडुरंग चव्हाण यांची मरडवाक गावच्या लोकनियुक्त सरपंच पदी निवडून आले आहेत,व सहा सदस्य मोठ्या मताधिक्याने विजय झाले, सर्वांच्या एकजुटीने,व विकास कामांच्या जोरावर मतदार बंधूंनी मोठा विश्वास ठेवून, निवडणून दिले आहे,त्यांचा विश्वासाला कोठेही तडा जाऊन न देता सगळ्यांना बरोबर घेऊन पुढील वाटचाल केली जाईल असे मत नवनिर्वाचित सरपंच संतोष पांडुरंग चव्हाण यांनी व्यक्त केले.यावेळी सर्व विजय उमेदवारांना खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, सुरेंद्र दादा गुदगे, नंदकुमार मोरे, भास्कर शेठ चव्हाण, राजुशेठ चव्हाण,बापुशेठ पिसाळ, गणेश शेठ पवार, राहुल शेठ सुर्यवंशी, सतिश शेठ कदम,व जे पी ग्रुप बेंगलोर यांनी विजय उमेदवारांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.