क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नारायणगाव:-तमाशा पंढरी नारायणगाव येथे लोकनाट्य तमाशा मंडळांचा सन्मान सोहळा.

प्रतिनिधी प्रमोद देवाडीगा सातारा:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी प्रमोद देवाडीगा सातारा जिल्हाध्यक्ष

तमाशा पंढरी नारायणगाव येथे
लोकनाट्य तमाशा मंडळांचा सन्मान सोहळा.

नारायणगाव : सामाजिक क्रांतिकारक,स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांची 196 वी जयंती तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंतीचे औचित्य साधून लोकनाट्य तमाशा कलावंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. सुजन फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय याकूभाई इनामदार अध्यक्ष दत्त ज्येष्ठ नागरिक संघ महाळुंगे पडवळ होते. प्रमुख उपस्थिती श्री दत्तात्रय माळी सांगली अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समिती, श्री संपतराव जाधव अध्यक्ष भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती महाराष्ट्र , श्री कैलास जेजुरकर अध्यक्ष संजीवनी लोकसेवा संस्था महाराष्ट्र , श्री सागर जगताप अध्यक्ष समाज समता संघ पुणे जिल्हा यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा शुभारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित जाधव अध्यक्ष सुजन फौंडेशन आदर्की बुद्रुक फलटण यांनी केले.भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्ष व राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष निमित्ताने महाराष्ट्राची लोककला लावणी संस्कृती जोपासण्याचे काम आणि करमणूक , व मनोरंजनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम तमाशा मंडळे करत आहेत.लोकनाट्य तमाशा कलावंतांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्या उत्तर काळामध्ये सामाजिक प्रबोधन कार्यामध्ये बहुमोल योगदान दिले आहे. कलावंतांच्या कार्याच्या प्रती कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने सुजन फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने कलावंतांना मानचिन्ह, महावस्त्र ,गौरव चिन्ह गुलाब पुष्प व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा देऊन यांचा सन्मान करण्यात आला.

सन्मानाचे मानकरी मालती इनामदार तमाशा मंडळ , तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर तमाशा मंडळ , विलास कुमार देवठाणकर सह शेषकन्या पुणेकर तमाशा मंडळ, वामन पाटोळे मेंढापुरकर तमाशा मंडळ, सर्जेराव जाधव निमगावकर तावडी तमाशा मंडळ, बाळा अल्हाट नेतवडकर तमाशा मंडळ, दत्तोबा तांबे शिरोलीकर तमाशा मंडळ, छाया खिलारे बारामतीकर तमाशा मंडळ, चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे चिरंजीव किरण कुमार ढवळपुरीकर तमाशा मंडळ, अंजली राजे नाशिककर लोकनाट्य तमाशा मंडळ, राष्ट्रपती सुवर्णपदक प्राप्त विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळ, रेखा सविता नगरकर तमाशा मंडळ ,सविताराणी पुणेकर तमाशा मंडळ , संध्या माने सोलापूरकर तमाशा मंडळ, हरिभाऊ बडे शिवकन्या बडे नगरकर तमाशा मंडळ , दत्ता महाडिक पुणेकर तमाशा मंडळ , नंदाराणी भोगटे तमाशा मंडळ, आम्रपाली पुणेकर तमाशा मंडळ, आनंद लोकनाट्य मंडळ जळगाव , कांतीलाल पाटील राशीकर तमाशा मंडळ, गणेश राजे सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ या मंडळांच्या श्री मुसा इनामदार, श्री अशोक साठे, श्री गायकवाड मॅनेजर ,श्री अरुण वायाळ , श्री बाळासो पाटोळे, मॅनेजर श्री दत्ता विधाते , श्री रंगनाथ गुळवे , श्री वैजनाथ क्षीरसागर, श्री सचिन ढवळपुरीकर , श्री शांताराम वाणी, श्री मोहित नारायणगावकर, श्री शरद दानवे ,श्री सादिक मणियार, श्री रामभाऊ बिरमल, श्री एल जी शेख, श्री काशिनाथ फुलसुंदर , श्री सुभाष श्री सोनवणे मॅनेजर,श्री राजू बागुल श्री रवी महाजन, श्री अरुण वाव्हळ, श्री शेख अख्तर या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संपतराव जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री एकनाथ आंबटकर ,श्री सुदाम पडवळ,श्री सुनील वाळुंज ,श्री काशिनाथ शिंदे , दत्तात्रय जेजुरकर,राष्ट्रपती सुवर्णपदक मानकरी विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले .श्री मोहित नारायणगावकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button