महाबळेश्वर:-अक्षय भालेराव हत्याकांडा प्रकरणी महाबळेश्वर तहसील कार्यालया वरती जन आक्रोश निदर्शने हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है म्हणत शासन यंत्रणेचा आंदोलकांकडून निषेध.
पत्रकार अनिता शिंदे सातारा:-8856097134

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
अक्षय भालेराव हत्याकांडा प्रकरणी महाबळेश्वर तहसील कार्यालया वरती जन आक्रोश निदर्शने हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है म्हणत शासन यंत्रणेचा आंदोलकांकडून निषेध.
नांदेड जिल्हा बोंडार हवेली गावामध्ये एक जून रोजी अक्षय भालेराव या युवकाची डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून काही अज्ञात गावगुंडांन कडून या युवकाची हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर हत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र सह देशात उंमंटू लागले त्याचेच प्रतीक म्हणून महाबळेश्वर तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील विविध संघटनांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अक्षय भालेराव हत्येप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शासन करा. अक्षय भालेराव खून खटला प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवा महाराष्ट्र मध्ये चाललेले दलित हत्याकांड थांबवा असे आंदोलकांनी निदर्शने करत आंदोलनाच्या माध्यमातून घोषणा देत आपला निषेध व्यक्त करत महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांना निवेदन देण्यात आले, यावेळी अनमोल कांबळे ,उत्तम भालेराव ,दीपक कांबळे सनी ननवरे जॉन जोसेफ ऋषिकेश वायदंडे सुनंदा मोरे व इतरही तालुक्यातील पक्षांचे व संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.