खटाव:-श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त चोराडे येथील जोतिबा मळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव
श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त चोराडे येथील जोतिबा मळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील चोराडे येथील श्री.ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त जोतिबा मळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी श्री.ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त
दि.११ एप्रिल ते १३ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी मंगळवार दि.११ एप्रिल रोजी सायं
७ वाजता श्री. ज्योतिर्लिंग देवाचा छबिना फटाक्याची आतिषबाजी, लेझीम, बँड व सनई पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येणार आहे.तर बुधवार दि.१२ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता दुग्धाभिषेक व पुजा बांधण्यात येणार आहे,सकाळी ११ वाजता लोकनाट्य तमाशा होणार असून रोजी दुपारी ४ वाजता जंगी कुस्त्याचे मैदान होणार आहे.तसेच ३ ते ६ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रात्री.९ वाजता, माया उंब्रजकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.
गुरुवार दि.१३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ११ पर्यत श्री.ज्योतिर्लिंग देवाची पालखी सह सासनकाठी गुलाल खोबऱ्याची उधळण करीत मिरवणुक निघणार आहे. तरी भाविक भक्तांनी यात्रेस उपस्थित रहावे,असे आवाहन यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे.